संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा आदीवासी वाडीवरील सुरेश भिवा जाधव व पत्नी पिंकी सुरेश जाधव व त्यांची तीन मुले असा रोज हातावर कमवणारा संसार परंतु पती -पत्नीच्या भांडणाची सीमा झाल्याने अखेर पती सुरेशने आंब्याच्या बागेत झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पती सुरेश ने आत्महत्या केल्याची खबर पत्नी पिंकी सुरेश जाधव वय ३० रा. म्हसळा आदीवासी वाडी हीने म्हसळा पोलीस स्टेशनला दिल्याने म्हसळा पोलीसानी अ.मृ.रजी. ४/२०२० सदर घटनेची नोंद केली.सुरेश भिवा जाधव व पत्नी पिंकी सुरेश जाधव व त्यांची तीन मुले मुळचे आदीवासी वाडी म्हसळा येथील आहेत, घटना घडली त्यावेळी ते कुटुंब फैसल गीते पाभरे यांच्या निगडी येथील आंबा बागायतीत राखणीचे (देखभाल) काम करीत होते त्याच ठीकाणी सुरेश यानी फास लावून घेतल्याचे तपासी अमलदार गणेश भोईर यानी सांगीतले.
Post a Comment