सर्व सामान्य ग्राहकानी खरेदीसाठी गर्दी करू नये : धनंजय पोरे


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
सर्वसामान्यांनी रस्त्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली तर प्रशासकीय यंत्रणेवर ताण मिर्माण होतो. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखणे अवश्यक आहे असे म्हसळा पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनी धनंजय पोरे यानी आमचे प्रतिनिधी जवळ वार्तालाप करताना सांगितले. म्हसळ्यातील नागरिकांचे प्रशासनाला सहकार्य असते त्यामुळे पाहिल्या दिवसापासून महसूल,पोलीस, आरोग्य, नगरपंचायत, पंचायत समिती व ग्रामपंचायत अशा प्रशासकीय मंडळीनी दिलेल्या आदेशाचे व नियमांचे पालन झाले.यापुढे नागरीकानी अधिक शिस्तीचे पालन करण्याचे आवश्यक आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सोशल डिस्टन्सचे महत्त्व जाणून याचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे.यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखणे आवश्यक असल्याचे मत पोरे यानी व्यक्त केले. म्हसळयात संचारबंदीच्या पहील्या दिवसांपासून पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक नियमानुसार एक मीटर किंवा तीन फुट अंतरावर दुकानांच्या बाहेर ग्राहकांना  उभारण्यासाठी चौकट किंवा सीमारेषा आखून दिल्या त्यामध्ये भाजीपाला विक्रेते मेडिकल स्टोअर, किराणा दुकाने यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी तसेच ग्राहकांनी या निर्देशांचे पालन करावे. जेणे करून दोन व्यक्तींच्या मध्ये सुरक्षित अंतर ठेवता येईल. लोक जितके एकमेकांपासून दूर असतील, तितकाच या विषाणूचा फैलाव कमी होत जाईल .जीवनावश्यक वस्तू ,किराणा मालाच्या दुकानांमध्ये ,मेडीकल स्टोअर तसेच भाजीपाला खरेदीसाठी लोक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत आहेत. बाजारपेठांमध्ये मोठ्या संख्येनं त्यामुळे गर्दी होत आहे.यासाठी यापुढे सोशल डिस्टन्सिंग राखणे अवश्यक आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत जातेय, त्यामुळे सरकार करत असलेले निर्देश पाळावेत. सामान्यांनी कुठेही जमाव, घोळक्यांनी राहू नये. शिवाय, कोरोनाची भीती न बाळगता आपापल्या घरी सुरक्षित रहावे. एकमेकांपासून अंतर राखावे या काळात सर्वांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्याचे काम शासनाचे बरोबरीने आपले सर्वांचे आसल्याचे पोरे यानी सांगितले.
"किराणा मालाच्या दुकानांमध्ये ,मेडीकल स्टोअर तसेच भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकानी व व्यापाऱ्यानी सोशल डिस्टन्सिंग राखणे हे दोघांचेही कर्तव्य आहे, भविष्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल"
-धनंजय पोरे, स.पो.नी म्हसळा पोलीस स्टेशन

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा