तळा (किशोर पितळे)
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रासह राज्यशासन परिपूर्ण प्रयत्न करते.मात्र यासाठी जनतेने शासनाला योग्य ते सहकार्य करणे अपेक्षित आहे.त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे,व गृहमंत्री अनिल देशमुख जनतेला वारंवार काळजी घेण्याचे आवाहन करीत आहेत. जिल्हा प्रशासन,प्रांताधिकारी,महसूल खाते, आरोग्य यंत्रणा संपूर्ण स्तरावर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा स्वच्छता राखा, मास्कचा वापर करा सुरक्षितअंतर राखा,खोकला शिंक आल्यास रूमालाचा वापर करा हात पाय, सँनीटायझर किंवा साबणाने स्वच्छ धुवा,बाहेरून आल्यावर हात पाय धुऊनच घरात जा.अशा सूचना देण्यात येत आहेतच याबरोबरच संपूर्ण गावात, ग्रामीण भागात सरपंच, गाव अध्यक्ष, पोलीस पाटील, आशा सेविका, अगंणवाडी सेविका होमगार्ड पथक, पोलीस, आरोग्य यंत्रणा,ग्रामसेवक, ग्रामसेविका, युवा स्वंयसेवक नेमणूक करण्यात आली आहे.सलून व्यवसायीकांनी मात्र३१मार्चपर्यंत बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी बाजारपेठेत भाजी,किराणामेडिकल दुकानदाराच्या समोर मीटरचे अंतर राखून माल खरेदीसाठी चौकोन तर वर्तुळ काढण्यात आले असून त्याप्रमाणेच अत्यावश्यक असणारा माल खरेदी केला जात आहे. बँकांंमध्ये चार ते पाच कस्टमर सोडले जात आहेत. रेशनिंग दुकानावर देखील सुरक्षित अंतर ठेवण्यात आले आहे. किराणा वाजवीपेक्षा अधिक घेऊन स्टाँक करू नका तसेच वाजवीपेक्षा अधिक दराने व्यापारी विक्री करीत असल्यास लक्ष ठेवून रहा व त्या व्यापारावर केली जाईल यासाठी होमगार्ड व स्वंय सेवक अहोरात्र तैनात ठेवण्यात आले आहेत. नाका बंदी घालण्यात आली आहे. लाँक डाऊनने सर्व नागरिकघरातरहाण्याचेपसंतकेलेआहे. दळणवळणाची साधने बंद असल्याने संपूर्ण बाजारपेठ सुनीसुनीअसुन धार्मिक स्थळे,मंदिरे भक्ताविना ओस पडली आहेत गाव बंदी प्रवेशद्वार रोखण्यात आले आहेत. संपूर्ण बंदोबस्त गाव पातळीवर करण्यात आला असूनमाझा मी स्वताःचे रक्षक झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे जिल्हा व पोलीसप्रशासन,आरोग्य मंत्री यांनी या गाव बंदी ला रोखण्यास मज्जाव केला आहे. तसे आदेश नगरपंचायत ग्रामपंचायत प्रशासनाला दीले आहेत. असे असले तरी देखील युवा पिढीला मात्र या कोरोना व्हायरसचे व कलम (१४४)संचार बंदीचे तितकेसे गांभीर्याने घेताना दिसत नाही. प्रशासन प्रत्येक वेळी टीव्ही च्या माध्यमातून अपडेट,किंवा माहिती व काळजी घेण्याचे आवाहन करीतआहेत. शासनाने दिलेल्या आदेशाचे पालनकरणे हे प्रत्येकनागरीकांचे कर्तव्य व जबाबदारी असून कोरोना संसर्गापासून बचाव होण्यास किंवा रोखण्यास यशस्वी होऊ शकतो त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन करण्यात येत आहे.
Post a Comment