सहकार्य करा... काही दिवसांचा संयम पुढील जीवन सुखकर करणार आहे...


दोन दिवसांपूर्वीच मी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारकडून आपल्याला किती अन्नधान्य उपलब्ध झाले आहे तसेच विविध योजनांच्या अंतर्गत त्याचा पुरवठा कशाप्रकारे करायचा आहे, याचा आढावा घेतला. 

एप्रिल महिन्यापासून तीन महिने मोफत अन्नधान्य देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तरी लाभार्थींना कोणतीही गर्दी किंवा गडबड न करता शांतपणाने हे अन्नधान्य आपल्या घरी न्यायचे आहे. जिल्ह्यातील बहुतांश कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील मदत एप्रिलमध्ये तसेच गृहिणींना उज्ज्वला योजनेंतर्गत तीन महिने मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे. या सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत याची खबरदारी मी, राज्यमंत्री ना. आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे प्रशासनाच्या मदतीने घेत राहू.

रोहा नगरपालिकेने तीन दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन आजपासून सुरू केला आहे, याचा अभिमान वाटतो. गेल्या आठवड्यातही त्यांनी हा प्रयोग केला होता. याला प्रशासनाने आणि जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही याचा अवलंब केला पाहिजे.

आजवर प्रशासनाला आपण सहकार्य करत आलात. त्याचप्रमाणे मीच माझा रक्षक या भावनेने स्वतःची काळजी घेत, शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करत आपण पुढेही सहकार्य करत रहावे. आपला प्रतिनिधी म्हणून मी कायम आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा