अलिबाग– करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.
रायगड जिल्हयाच्या संलग्न ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग व सातारा या जिल्ह्याच्या सीमा जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा व नाशवंत मालाच्या वाहतुकीव्यतिरिक्त अन्य वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
त्या व्यतिरिक्त रायगड जिल्ह्यामधील मंडळांचे सुरक्षारक्षक व खाजगी एजन्सीमार्फत नेमणूक केलेल्या कार्यरत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील सुरक्षारक्षक व त्यांची वाहने (कर्तव्यावर). कृषी वस्तू व उत्पादने वस्तूंची आयात व निर्यात करणारी वाहने, आधीच्या आदेशाप्रमाणे सवलत दिलेले अधिकारी, कर्मचारी यांनी त्यासाठी ओळखपत्र व विशेष कार्यासाठी नेमणुकीबाबतचे आदेश इत्यादी कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक असेल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड-अलिबाग श्रीमती निधी चौधरी यांनी निर्देश दिले आहेत.
Post a Comment