अलिबाग,- पनवेल तालुक्यातील न्हावा गावच्या श्रीमती रुची लाखन सिंग या गरोदर मातेस अंगणवाडी सेविका सुनिता भोईर यांनी गृहभेट दिली, तेव्हा श्रीमती रुची लाखन सिंग यांना प्रसूती वेदना सुरु झाल्या होत्या.
अंगणवाडी सेविकेने तात्काळ ग्रामपंचायतीला कळविले, लागलीच रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली,आशा वर्कर संगिता भोईर यांना सोबतीला घेवून श्रीमती सिंग यांना गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
काही वेळातच गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्मिता बोंबाटकर यांनी श्रीमती रुची लाखन सिंग यांची तपासणी केली व त्यांची प्रसूती नॉर्मल होवून त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळ व माता दोघांचीही तब्येत छान आहे.
करोना विषाणू विरोधातील या युध्दसदृश्य परिस्थितीत जिल्हा प्रशासनातील सर्वच अधिकारी, कर्मचारी नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.
Post a Comment