म्हसळा : दिघी नाकाचे नामकरण “श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक” करा ; शिवप्रेमींची मागणी

 म्हसळा शहरात तिथीनुसार उत्साहात साजरी 

म्हसळा : सुशील यादव 
म्हसळा शहरातील दिघी नाकाचे नामकरण “श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक” करा अशी मागणी गुरुवारी ( १२ मार्च ) शहरात साजरी झालेल्या तिथीनुसार शिवजयंती च्या मिरवणुकीत करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की म्हसळा शहरात सालाबाद प्रमाणे तिथीनुसार शिवजयंती गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तसेच शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात येते. यामध्ये गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे रायगडावरून शिवज्योत , तसेच पालखी , श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ तसेच साहसी प्रात्याक्षिके यांच्या समवेत शहरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे यावर्षीही गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान चे अध्यक्ष सचिन करडे यांच्या समवेत प्रतिष्ठान चे कार्यकर्ते रायगडावरून म्हसळा शहरा पर्यंत रात्र भर पायी धावत येत शिवज्योत घेऊन आले. व त्यानंतर शिव-पालखी पूजन करून पत्रकार सुशील यादव यांच्या हस्ते नारळ वाढवून सचिन करडे यांच्या निवास्थानापासून शिवजयंती मिरवणुकीस सुरुवात झाली. पुढे म्हसळा एस.टी. बस स्थानका पासून शिवसेनेचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत चित्र रथ सामील झाला व या मिरवणुकीला एक भव्य दिव्य असे रूप आले. यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष पत्रकार निकेश कोकचा यांनी परिधान केला होता. पुढे दिघी नाका येथे च्याम्पियन कराटे क्लब च्या विद्यार्थी व शिक्षकांनी लाठी-काठी, दांडपट्टा, भाला , नान चाकू, च्या सहाय्याने अनेक चित्त थरारक असे साहसी खेळाचे प्रदर्शन केले. याच दरम्यान गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान व शिवसेना शहर म्हसळा च्या वतीने म्हसळा शहरातील या दिघी नाकाचे नामकरण  “श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक” करण्यात यावे, तसा ठराव मंजूर करण्यात यावा यासाठी म्हसळा नगरपंचायत ला निवेदन देण्यात आले. शिवजयंतीच्या दिवशीच  “श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक” नामकरणाच्या मागणीने मिरवणुकीत सामील झालेल्या सर्वच महिला , पुरुष शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला व “जय भवानी, जय शिवाजी”, “श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय” च्या घोषणानी संपूर्ण दिघी नाका दुमदुमला. पुढे श्री धावीर देव मंदीर पटांगणात मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकी मध्ये शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष समिर बनकर, माजी उपजिल्हा प्रमुख सुभाष(भाऊ) करडे ,शहरप्रमुख अनिकेत पानसरे, युवा सेना शहर अधिकारी सुजित बोरकर, नंदू शिर्के, योगेश करडे, यतीन करडे, प्रसन्ना निजामपूरकर, कौस्तुभ करडे,राजेश करडे, महेश म्हशीलकर, भाई बोरकर, गणेश हेगिष्टे, दिनेश म्हशीलकर, संतोष पानसरे यांच्या सहित शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा