माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्ग दर्जा हीन रस्ता ; प्रशासनाने भ्रष्टाचाराला कोरोना प्रमाणे प्रतिबंध करावा.


माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्ग दर्जा हीन रस्ता : प्रशासनाने भ्रष्टाचाराला कोरोना प्रमाणे प्रतिबंध करावा.
महादेव पाटील यांच्या उपोषणावर कोरोनाचे सावट.

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
जळगाव ते दिघी पोर्ट' या नव्याने होणाऱ्या '७५३ एफ' राष्ट्रीय महामार्गाच्या माणगाव ते दिघी या टप्प्यातीत कामात ठेकेदारानी अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. या साठी म्हसळा शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील व शिवसैनिक या भागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व महामार्गातील कामातील भ्रष्टाचाराला प्रतिबंध करण्यासाठी सोमवार दिं.१६मार्च २०२० रोजी म्हसळा तहसीलदार कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचे नियोजन आहे. त्या बाबतचे योग्य मुदतीत पाटील यानी शासनाला पत्र दिले आहे.परंतु राज्य शासनाने नुकतेच कोरोनो मुळे सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येण्याबाबतचे परिपत्रक व पत्र म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यानी महादेव पाटील याना दिले आसल्याने उपोषण स्थगीत होण्याची शक्यता शिवसैनीकांच्या गोटांतून व्यक्त होत आहे.
माणगाव ते दिघी या टप्प्यातीत कामात दिघी-वडवली फाटा-मेंदडी-म्हसळा -साई-मोर्बा-माणगाव या सुमारे ५५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे दुपदरीकरण व कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु असून बहुतांश काम निकृष्ट दर्जाचे आसल्याची पाटील व शिवसैनिकांची मुख्य तक्रार आहे.
उपोषणासाठी महादेव पाटील यांच्या समवेत शहरप्रमुख अनिकेत पानसरे, संघटक कृष्णा म्हात्रे, राजा तीळटकर, सरपंच अनंत नाक्ती, अनिल महामुनकर,गणू बारे, तुकाराम चाळके, संतोष सुर्वे, लक्ष्मण पाटील आदी शिवसैनीक उपोषणाला बसणार आसल्याचे या वेळी सांगण्यात आले.

"कोरोना ही राष्ट्रीय संकट व आपत्ती आहे त्यामुळे माणगाव ते दिघी या टप्प्यातीत सुमारे ५५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम थांबलेले नाही, सदोष, निकष सोडून व भ्रष्टाचाराने होत असलेल्या कामाबाबत शासन दखल का घेत नाही ? ही समस्या असून याबाबत "महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाला" जिल्हाधिकारी रायगड यानी समज देऊन कामाचा दर्जा सुधारणे बाबत लेखी उत्तर घेणे आवश्यक आहे."
-महादेव पाटील , तालुका प्रमुख शिवसेना, म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा