संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
कोरोना रोगाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानने म्हसळयातील ३५ ग्रामपंचायतीना फवारणी पंप व निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडीयम हायपोक्लोराईड हे औषध मोफत वाटण्याचा कार्यक्रम पंचायत समितीच्या प्रागणांत संपन्न झाला. यावेळी सभापती श्रीमती उज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर, रा. जि.प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन शेट मनवे, पं.स. सदस्य संदिप चाचले, सदस्या छाया म्हात्रे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्ष श्रीमती रेश्मा कानसे, ग. वि.अ.वाय.एन.प्रभे, स.पो.नी. धनंजय पोरे,सहा.गट विकास अधिकारी प्रदीप डोलारे, काँग्रेस (आय)चे तालुका अध्यक्ष तथा सरपंच निगडी महादेव भिकू पाटील या मान्यवरांचे हस्ते तालुक्यातील आंबेत, रोहिणी,आडी महाड खाडी, भेकरेचा कोंड, पाभरे, निगडी, कांदळवाडा, खरसई, मेंदडी, रेवली, वरवटणे, गोंडघर, खारगाव खुर्द, कणघर, लेप, कोळे,नेवरूळ, जांभूळ, घूम,साळविंडे, मांदाटणे, ठाकरोली, कोळवट, केलटे, तोंडसुरे,घोणसे, खामगाव, कुडगाव, संदेरी, चिखलप,तोराडी, पांगळोली, वारळ, तुरुंबाडी, काळसूरी, या ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक मंडळीना नेपसैक पंपाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठान तर्फे औषध फवारणी बाबतचे प्रमाण, फवारताना घेण्याची काळजी याबाबत परिपूर्ण माहीती देण्यात आली.
Post a Comment