तळा (किशोर पितळे)
संपूर्णजगात कोरोनाविषाणूजन्य संसर्ग रोगाने हाहाःकार माजवला असुन या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रधानमंत्री मंत्री मा.नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे त्याला सर्व स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे .संपूर्ण देशात लाँक डाऊन केले असूनसंचारबंदीघातलीआहे. सर्वजण घरात आहेत त्यामुळे सर्व बाजारपेठा, औद्योगिक कारखाने, कार्यालये बंद असल्याने सामान्य माणसाच्या जीवनाश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत.त्यामुळे सर्व सामान्य नागरिक मोलमजुरी करणाऱ्याचे हाल झाले आहेत तसेच हाताला काम नसल्याने एक वेळेच्या जेवणाचे वांदे झाले आहेत.समाजातील गोरगरीबांंसाठी दिनांक 30/03/2020 रोजी विश्व हिंदू परिषद, जिल्हा - रायगड तर्फे तळा प्रखंडातील निराधार व गरजू बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचे (तेल, कांदे, बटाटी, तूरडाळ, हरभरे, जिरा, मोहरी, लसून व मसाले) वितरण चालू करण्यात आले.शहरातील तळा बौद्धवाडी, रोहिदास आळी, कुंभार आळी , पारधी आळी व मोहिते आळी (वडाची वाडी) असे ऐकून १८कुटुंबियांनान अन्न धान्य वितरीत करण्यात आले.हा आदर्श घालून समाज बांंधिलकी जपत व माणूसकीचे दर्शन घडवून सामाजीक कार्यात मोलाचा सहभाग घेतला या समाज कार्यात श्री.गणेश मानकर, श्री.विजय धामणकर,श्री प्रशांत सकपाळ ,व सुयोग बारटक्के राजेश खोत व प्रशांत नांदगावकर आणि राहुल तळकर यांनी भाग घेतला. यापुढे देखील समाजातील उपेक्षित कुटुंबात वाटप केले जाणार आहे तरी तळा प्रखंडातील गरजू बांधवांनी स्थानिक कार्यकर्त्याना संपर्क करावा असे विश्व हिन्दू परिषदेने आवाहन केले आहे.
Post a Comment