कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हसळा कर विशेष सर्तक : आरोग्य विभाग कमी पडू नये नागरिकांची अपेक्षा.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
कोरोना व्हायरसरच्या पार्श्‍वभूमीवर पुढील सात दिवस धोक्याचे असून, नागरिकांना अत्यावश्‍यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. अशा पध्दतीने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व नगरपंचायत विभागाने नागरिकांमध्ये जनजागृती केल्याने आज म्हसळा बाजारपेठेत गर्दी कमी झाल्याचे चित्र होते, नागरी प्रवासी वाहतुक सुध्दा निम्म्यावर आल्याचे सांगण्यात आले.गर्दी टाळणं हा करोना रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय असल्याचं समोर आलं आहे.कोरोना' आजाराबाबत नागरिकांमध्‍ये जनजागृती करण्‍यासाठी या आजाराची लक्षणे व नागरिकांनी काय दक्षता घ्‍यावी याबाबतचे माहिती फलक नगर पंचायत व तालुक्यातील ३९ ग्रामपंचाय- तीच्या माध्यमातून तालुक्यांतून सर्व गाव वाड्यांत लावण्यात आले आहे.त्या दृष्टीनं म्हसळा नगरपंचायतीने उपाययोजना केल्या जात आहेत. दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आवाहन म्हसळा नगरपंचायतीच्या महापौर जयश्री कापरे यानी केले आहे.
" म्हसळा तालुक्यातील आरोग्य, ग्रामिण रुग्णालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत,प्राथमिक शिक्षण विभाग नगरपंचायत, बालविकास प्रकल्प अधिकारी, आशा अंगणवाडी सेविका पोलीस विभाग, खाजगी वैद्यकिय व्यवसायीक, पॅथॉलॉजीस्ट ही सर्वच मंडळ महसुल विभागाच्या समन्वयाने काम करीत असल्याचे नागरीकांकडूनकौतुक होत आहे.
दरम्यान रायगड जिल्ह्यात परदेशातून आतापर्यंत २१४ नागरिक भारतामध्ये परतले आहेत. पैकी १६८ नागरिकांना जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या निगराणी कक्षात ठेवण्यात आले आहे, तर ४६नागरिकांना त्यांच्याच घरी निगराणीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकिसत्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिली.कोरानाच्या धसक्याने सवर्त्रच खळबळ माजली आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यात एकच कोरोना बाधीत रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे सांगितले. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, काळजी घ्यावी, हात स्वच्छ धुवावेवत, शिंकताना, खाेकताना रुमालाचा वापर करावा असे आवाहन डॉ. प्रमोद गवई यांनी केले.

"म्हसळा ग्रामिण रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षकांसह , वैद्यकिय अधिकारी,औषध निर्माण अधिकार, स्टाफ नर्स, आवश्यक तांत्रिक उपकरणे, कोरोनासाठी आवश्यक औषधे, N 95 मास्क, ट्रिपल रेअर मास्क, सॅनी टायझर, व्हीटीएम व पिपिइ किटचा तात्काळ पुरवठा व्हावा म्हणून विशेष पाठपुरावा करण्यात येणार आहे."
बाबू शिर्के,अध्यक्ष प्रेस क्लब म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा