म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते रायगडचे खासदार सुनिल तटकरे श्रीवर्धन येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2020 रोजी तालुक्यातील विकास कामांचा आढावा दौऱ्यावर आले असताना म्हसळा शासकीय विश्रामगृह येथे म्हसळा तालुका ग्रामीण भाग आणि शहरातील विकास कामांना गतिमान चालना देण्यासाठी तालुक्यातील अधिकारी वर्गासोबत चर्चा करून रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले
म्हसळा तालुक्यात मागील काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळात खासदार सुनिल तटकरे यांनी शासनाकडून मंजुर केलेली अनेक लोकपयोगी विकास कामे विविध कारणाने आडून राहिली आहेत त्यामुळे आम नागरिकांना मोठया समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागातील व नगर पंचायत हद्दीतील मंजुर कामांना शासन स्तरावर तातडीने गती मिळावी यासाठी खासदार सुनिल तटकरे यांनी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याकडे चर्चा करून कामाचा गतिमान आढावा घेतला.
पाणी पुरवठा योजना, रस्ते विकास, परिवहन सेवा, पोलीस, महसूल विभागाच्या अनेक कामांबाबत खासदार सुनिल तटकरे यांनी जिल्ह्यातील विविध प्रमुख अधिकारी वर्गाकडे फोनवर संपर्क साधून विकास कामांना गती मिळाली व त्या कामी कागदोपत्री पूर्तता करण्याचे आदेश दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका नेते अलिशेठ कौचाली, तालुका अध्यक्ष समीर बनकर, सभापती उज्वला सावंत, नगराध्यक्षा जयश्री कापरे, माजी सभापती छाया म्हात्रे, माजी सभापती नाझीम हसवारे, माजी उपसभापती संदीप चाचले, उपनगराध्यक्ष सुहेब हलदे,गट नेते संजय कर्णिक,माजी नगराध्यक्षा फळकनाझ हुर्जुक, रेश्मा काणसे, तहसीलदार शरद गोसावी, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, बांधकाम अभियंता काकुलसे, जि.प.पाणी पुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे, सा.बा.अभियंता गणगने, प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे आदी मान्यवर तालुक्यातील सरपंच,विविध खात्याचे अधिकारी वर्ग,पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा शहरातील रस्त्यांची कामे किरकोळ रकमांची न करता ती एकाच वेळी शासन मंजुरी घेऊन दर्जेदार पध्दतीने करावीत अशा सुचना संबंधितांना दिल्या आहेत. तालुक्यात सुनिल तटकरे यांनी शासनाकडून विविध लोकपयोगी विकास कामांसाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे परंतु अनेक ठिकाणी कामे प्रलंबित आहेत आणि तक्रारी जास्त असल्याने खासदार सुनिल तटकरे यांनी चर्चे वेळी संबंधितांवर नाराजी व्यक्त केली.
Post a Comment