बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार : म्हसळा शिक्षण विभागाने ५० मुलाना आणले शिक्षण प्रवाहात


हंगामी स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या मुलांना जि प शाळेत केले दाखल.

संजय खांबेटे : म्हसळा   प्रतिनिधी
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी हंगामी स्थलांतरित होऊन येणाऱ्या कुटुंबातील मुलांना त्या ठिकाणी जवळ असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत दाखल करणे बंधनकारक आहे म्हसळा तालुक्यात ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात वीटभट्टी चे कामे सुरु होत असतात आणि या वीटभट्टीवर मोलमजुरीसाठी आदिवासी कुटुंबे स्थलांतरित होऊन येत असतात तसेच त्यांच्या समवेत सहा वर्ष ते चौदा वर्ष वयोगटाची बालके देखील स्थलांतरित होऊन येतात .अशाच वीटभट्टीवर स्थलांतरित झालेल्या कुटुंबांचा खारगाव खुर्द, सावर, खरसाई मराठी, बनोटी, रेवली परिसरात सर्वेक्षण करण्यात आला. या सर्वेक्षणात काही कुटूंबे स्थलांतरित झालेले दिसून आले हि गोष्ट लक्षात आल्यावर म्हसळा गटाचे प्रभारी गट-शिक्षणाधिकारी साहेब संतोष शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रप्रमुख बी आर सी ची टीम सलाम कौचाली, किशोर पैलकर ,संदिप भोनकर ,नंदकुमार जाधव, दिपक पाटील , उमेश गोराडे ,अनिल बेडके यांनी सर्व वीटभट्टीवर भेट देऊन शाळाबाह्य मुलांच्या पालकांची भेट घेऊन त्यांच्या मुलांना नजीकच्या शाळेत दाखल करण्यासाठी राजी करण्यात आले पालकांनी देखील आपल्या मुलांना शाळेत दाखल करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. म्हसळा तालुक्यातील खारगावखुर्द, बनोटी, खरसई मराठी, देहेन(नर्सरी), अशा जिल्हा परिषद शाळेत एकूण 50 शाळाबाह्य विद्यार्थी दाखल करून घेण्यात आले आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार त्याना मिळवून दिला.

         म्हसळा तालुक्यात वीटभट्टी, दगडखाण काम, रस्ता बांधकाम अशी अनेक कामे ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंत चालू असतात या कामासाठी राज्यांतील अनेक भागातून मोलमजुरीसाठी काही आदिवासी व अन्य कुटुंबे स्थलांतरित होत असून त्यांच्याबरोबर त्यांचे पाल्य देखील स्थलांतरित होतात आणि हे पाल्य दगड-माती खड्डे रस्ता किंवा इकडे तिकडे फिरताना दिसून येतात अशा मजूर कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होत असते, या मजूर तत्सम लोकांनाआपल्या मुलांच्या शैक्षणिक नुकसानीचे तेवढे गांभीर्य अनेकदा नसते यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार एकही बालक शिक्षणा पासून वंचित राहणार नाही या बाबत शासनाने कायदा केला आसल्याचे गट शिक्षण आधिकारी शेडगे यानी सांगितले.

"तालुक्यात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 राबविताना विट भट्टी व अन्यकामाच्या ठिकाणी शिक्षक वर्ग अशा मुलांचा शोध घेऊन स्थानीकांच्या सहकार्याने त्यांना त्वरित जवळच्या शाळेत दाखल करण्यात येते"
संतोष शेडगे, प्र. गट शिक्षण आधिकारी
, म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा