प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
श्री हनुमान आळी मंडळ खरसई मुंबई आणि विजय हनुमान क्रीडा मंडळ खरसई- मुंबई ( रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने खरसई येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या मंडळाचा हा विसावा क्रीडा मोहत्सव असून विभागातील कबड्डी संघांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेतील अंतिम विजयी संघाला रोख रक्कम ७००१/- व विजय हनुमान करंडक देऊन सन्मानित करण्यात येईल तसेच अंतिम उपविजेता, उपांत्य विजयी, उप उपांत्य विजयी संघास अनुक्रमे ५००१, ३००१, ३००१
व विजय हनुमान करंडक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिस्तबद्ध संघ, उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट पक्कड यांचा विजय हनुमान करंडक देऊन सन्मान करण्यात येईल असे संस्थेचे संस्थाप्रमुख श्री बाळाराम पयेर यांनी म्हसळा लाईव्ह शी बोलताना सांगितले.
गावातील परिसरातील सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी व गावातील तमाम रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री कमलेश खोत यांनी केले आहे.
Post a Comment