विकासाच्या गावातील ग्रामपंचायतीची भिंत कोसळली : तालुक्यातील निकृष्ट दर्जाची कामे चव्हाट्यावर

संजय खांंबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीत विकासाची ग्रामपंचायत म्हणून प्रसीद्ध असलेल्या घुम-रुद्रवट ग्रामपंचायत कार्यालय इमारतीची मुख्य भिंत पडल्याची घटना नुकतीच घडली. हे गाव तालुका पंचायत समीतीच्या आसभापतींचे गाव आसल्याने वादळी अगर सुसाट्याचा वारा अशी अपत्ती नसतानाही इमारतीची मुख्य भिंत पडल्यामुळे तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ग्रामपंचायतीची इमारत बांधल्यापासून 10 ते 15 वर्षाचे कार्यकाळात याग्रामपंचायत कार्यालयाची इमारत पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सन 2003 - 04 साली नव्याने बांधण्यात आलेल्या कार्यालयाची मधल्या काळात अनेक वेळा दुरुस्ती व डागडुजी साठी लाखो रुपयांचा खर्च देखील करण्यात आला होता .या कार्यालयात फक्त ग्रामसेवक कार्यालयीन कामकाजसाठी बसतात मात्र इतर ग्रामसभा व महत्वाच्या सभा अंगणवाडीच्या इमारतीत घ्याव्या लागतात. अनेक वर्षांपासून इमारतीची काही भाग डागडुजी करण्यासारखा होता परंतु या महत्वाच्या प्रश्नाकडे ग्रामपंचायतने लक्ष न दिल्यानेच ही घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही अशी माहिती ग्रामसेवक विरकुड यांनी सांगितली आहे.

"मागील ५ ते १० वर्षाचे कालावधीत जिल्हा नियोजन, जिल्हा परीषद ,पंचायत समीती, कृषी विभाग, ग्रामंपंचायत १४ वा वित्त आयोग अशा निधीतून विकसीत केलेल्या प्रत्येक निधीतून झालेली कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत त्यामुळे विहीर, ग्रामपंचायत इमारत, कृषी विभागाचे बंधारे, भक्त निवास हे या घटनेचे जिवंत उदाहरण आहे निकृष्ट दर्जाचे कामाची चौकशी होऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी"
महादेव पाटील, तालुका प्रमुख, शिवसेना म्हसळा.

"ग्रुप ग्रामपंचायत घुम-रुद्रवट कार्यालयाच्या इमारतीची पूर्वेकडील बाजूची भिंत पडली आहे. या घटनेबाबत घटनास्थळी पंचनामा केलेला असून नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे."
-गुरुनाथ विरकुड, ग्रामसेवक - घुम रुद्रवट ग्रामपंचायत

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा