जनता दरबारात कामचुकार अधिकारी वर्गावर जनतेकडुन आगपाखड.
तळा : किशोरपितळे
कामचुकार सरकारीबाबू, अधिकारी त्यांच्याकडून पदोपदी होणारी हेळसांड, त्यामुळे सहन करावा लागणारा प्रचंड मनस्ताप सोमवारी तळेकरांनी जनता दरबारात तक्रारींमधून व्यक्त केला. पालकमंत्री अदितीताई तटकरे यांनी तळेवासीयांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. नागरिकांच्या तक्रारी सोडविणे ही माझी जबाबदारी असून, समस्यांचे निराकरण केले जाईल, अशी ग्वाही अदिती तटकरे यांनी दिली. सरकारी कार्यालयांशी संबंधित सामान्य माणसांची कामे सहजासहजी मार्गी लागत नाहीत. वारंवार हेलपाटे मारूनही त्यांच्या पदरी केवळ निराशाच येते. निराशेला वाट मोकळी करून देण्याची संधी या माध्यमातून सोमवारी तळेवासियांना मिळाली.
पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या जनता दरबारात100हून अधिक तक्रारींचा पाऊस पडला.
दुपारी तीनपासून जनता दरबारला सुरुवात झाली. तालुक्यातील तक्रारदारांना बोलावून त्यांची गाऱ्हाणी पालकमंत्री अदितीताई तटकरे, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसिलदार अण्णापा कनशेट्टी, नगराध्यक्षा रेश्मामुंढे, सभापती देविकालासे, उपसभापती गणेश वाघमारे, रा जि प महीला बालकल्याण सभापती गीता जाधव राजिप सदस्य बबन चाचले पं.स.सदस्याअक्षरा कदम, पोलिस निरीक्षक सुरेश गेंगजे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी ऐकून घेतली. सायं सहा वाजेपर्यंत हा जनता दरबार सुरू होता. वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभारही यावेळी चव्हाट्यावर आणण्यात आला. ग्रामीण भागात ग्राहकांना अवाजवी बिले येत असून,कोणतीही नोटीस न देता अधिकरयांकडुन मीटर कापले जात असल्याची तक्रार करण्यात आली त्याचप्रमाणे अधिकारी मुजोरपणे वागत असुन कधीच कार्यालयात भेटत नसल्याचे अनेकांनी सांगितले तर काहींनी अधिकारी व्यसन करुन कामावर येत असल्याचा गंभीर आरोप केला.यावेळी अधिकारी यांच्यावर जनतेने गंभीर आरोप केले. अर्ज करुन सुध्दा नवीन मीटर बसविला जात नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दोन्ही अधिकारी यांनी आठवड्यातुन मंगळवारी एका कार्यालयात बसुन जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत व अहवाल सादर करण्याचे आदेश यावे पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले. दुय्यम निबंधक कार्यालयाचा मनमानी कारभारा कारभार सुरु असुन नियमाच्याविरुद्धखरेदी खत होत असल्याची तक्रार जनतेकडुन करण्यात आल्या त्याचप्रमाणे एखादा दलाल किंवा बील्डर यांचे खरेदीखत असले की ताबडतोब होते परंतु सामान्य शेतकरी असल्यास त्यास नेट नाही असे सांगण्यात येते त्यामुळे सामान्य शेतकरयासाठी वेगळी भुमिका आणि दलाल आणि बिल्डरांची पध्दतशीर खरेदीखत करण्यात येते अशी दुटप्पी भुमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यवर कारवाई करण्याची मागणी जनतेकडुन करण्यात आली यावर पालकमंत्री यांनी लेखी तक्रार देण्यात यावी यावर कारवाई होईल असे आश्वासन दिले. तळा तालुक्यात उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे अनेक कुटंबाचे मुंबई व उपनगरात स्थलांतर झाले आहे,खेडेगाव ओस पडली असल्याने मोठ्या प्रमाणात लोकसंखेत घट झाली असल्याने त्याचा फटका तळा बाजारपेठेवर झाला असुन बाजारपेठेचा आर्थिक कणाच मोडला आहे यावर उपाय म्हणुन आपण तालुक्यात उद्योगधंदे आणावेत अशी मागणी जनतेच्या वतीने पत्रकार संजय रिकामे यांनी केली.यावर पालकमंत्री यांनी आपण त्याला पहीले प्राधान्य दिले असुन रासायनिक विरहीत उद्योगधंदे व लघु उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशिल असुन त्यासाठी शासनस्तरावर बोलणी सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महसुल खाते निरुत्तर..मांदाड येथे फाॅरेस्ट हील या नावाने एक अत्याधुनिक रिसॉर्ट सुरु आहे मुंबई व परदेशातुन याठिकाणी आॅनलाईन बुकींग करुन टुरीस्ट वर्ग येत असतो येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत व्यवसाय सुरु असुन येथे महसुल खात्याने कोण कोणती परवानगी दिली आहे यासंदर्भात विचारणा केली असता महसुल खाते यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी गायब...
जनता दरबारसाठी प्रत्येक खात्यातील अधिकारी वर्गाला या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे मुंबई येथुन मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी श्री.बागुल आणि श्री.पवार हे आले होते. परंतु त्यांची तक्रार होणार आहे असे समजताच त्यांनी या बैठकीतुन पळ काढला माईक वर या दोन अधिकारयांची नावे पुकारल्यानंतर देखील ते हजर झाले नाहीत त्यांनी तेथुन पळ काढला अशा कामचुकार अधिकारयांवर कारवाई करण्याची मागणी जनतेकडुन करण्यात आली.
तालुक्यातील अनेक मुख्य रस्तेआणिपुलांचीडागडुजी, पाणी पुरवठा योजना, त्याचप्रमाणे आरोग्य, महागाव प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व रखडलेली विकास कामे यावर जनतेने प्रश्न मांडले तालुका निर्माण होउन २१काळ होऊनही शासकीय विश्रामगृह ईमारत उभारण्यासाठी जनतेकडुन मागणी करण्यात आली तसेच आज वनखाते, पोलीस कार्यालय आणि मुख्य असणारे भुमि अभिलेख कार्यालय यांना स्वतःची जागा नसल्याने यांची कार्यालय भाडेतत्वावर गैरसोईच्या ठिकाणी थाटली गेली असल्याने या कार्यालयात सर्व सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.या सर्व कार्यालयांसाठी स्वतंत्र ईमारत मिळावी या महत्त्वाची मागणी पत्रकार किशोरपितळे यांनी केली. तळा पंचायत समिती त्याचप्रमाणे आयटीआय काॅलेज यांस पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती लागते याकडे जनतेने लक्ष वेधले तळा एसटी स्टँडची दुरावस्था झाली असुन ते नव्यानेबांधण्यात येण्याची मागणी पत्रकार कृष्णा भोसले यांनी केली त्याचप्रमाणे आधार कार्ड काढण्यासाठी तळा तालुक्यात कुठलीच सुविधा नसुन ती उपलब्ध करुन देण्याची मागणी जनतेकडुन करण्यातआली.
इंदापुर मांदाड रस्तामध्ये जमीन गेलेल्या शेतकरयांना अजुन मोबदला मिळाला नसल्याची तक्रार चंद्रकांत राऊत यांनी यावेळी करण्यात आली. अशा प्रकारे अनेक तक्रारी आणि समस्यांचा पाढाचातळेवासियांनी जनता दरबारात वाचला या सर्व तक्रारी आणि समस्यां सोडवण्यासाठी अधिकारी वर्गाने जनतेला सहकार्य करावे अशा सुचना दिल्या.त्याचप्रमाणे जे अधिकारी या जनता दरबारात उपस्थित राहीले नाहीत त्या अधिकारयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश त्यांनी यंत्रणेला दिला. तळा पंचायत समिती कार्यालयातील डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अदिती तटकरे यांनी तळा नगरपंचायत हद्दीत जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगराध्यक्षा यांच्याकडे केली महीला बचत गटामार्फत उद्योगांना चालना देणार असुन तालुक्यात लघुऊद्योग आणि रासायनिक विरहित कारखाने आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.त्याचप्रमाणे श्रीवर्धन मतदारसंघात येणारया सर्व एसटी स्टँडचे सुशोभिकरण करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले त्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या सोबत बोलणी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.तळा पंचायत समितीला पावसाळी गळती लागत असल्याने त्याचा ही दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असुन त्यासंबधी आर्थिक तरतुद करुन काम मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. काकडशेत येथील पाणी पुरवठा आणि विज पुरवठा ताबडतोब मार्गी लावण्याच्या सुचना त्यांनी संबंधित पदाधिकारी वर्गाला दिल्या छोट्या-मोठ्या समस्यांचे वेळेत निराकरण व्हावे, अशी नागरिकांची माफक अपेक्षा आहे. नेमकी तेथेच त्यांची निराशा होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित वागणूक मिळत नाही. अपेक्षित मार्गदर्शन केले जात नाही. अनेक प्रकरणांमध्ये पुरेसे ज्ञान नसल्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहतात. त्यामुळे नागरिकांनी या जनता दरबाराच्या माध्यमातून दाद मागितली आहे. नागरिकांच्या अनेक अडचणी, यंत्रणेबद्दल त्यांच्या मनात असलेला रोष यानिमित्ताने पुढे आला आहे. तक्रारदारांच्या या समस्यांचे निराकरण व्हावे, हा जनतेचा उद्देश असुन कमीत कमी आठ दिवसांत आणि जास्तीत जास्त ३० दिवसांत प्रत्येक समस्येचे निराकरण झाले पाहीजे अशी अपेक्षा जनतेकडुन व्यक्त केली जात आहे.त्याचप्रमाणे दर तीन महीन्यांनी जनता दरबार घेण्यात यावा सरकारी बाबू यांच्यावर वचक राहील आणि जनतेची कामे मार्गी लागतील अशीअपेक्षा तळेवासियांकडुन व्यक्त केली जात आहे.
Post a Comment