प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवाजी महाराजांची जयंती आज तालुक्यांत विविध शासकीय कार्यालय, प्राथमिक शाळां, हायस्कुल, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये मध्ये उत्साहात साजरी झाली. तहसीलदार कार्यालयांत तहसीलदार शरद गोसावी, पी. डी. पागिरे, दत्ता कर्चे , (प्र .मंडळ अधिकारी म्हसळा) महेश रणदिवे, ऐनकर मॅडम, मोरेश्वर जंगम, सुरज, पंचायत समिती म्हसळा येथे तालुका सभापती सौ उज्ज्वला ताई सावंत, जिल्हा कृषि व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, उपसभापती मधुकर गायकर,माजी सभापती छाया म्हात्रे, विद्यमान सदस्य संदीप चाचले,सतिश शिगवण,किरण पालांडे पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे अध्यक्ष संजय खांबेटे, सचिव अशोक काते, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, धनश्री नाक्ती, शक्ती कांडे, तुषार घाडगे, प्रशांत करडे आदी उपस्थित होते.
Post a Comment