म्हसळा तालुक्यात ग्रामिण भागात पुन्हा एकदा येऊ लागला चुलींतून धूर : अपुरे केरोसीन व महाग गॅसचे होते निमित्त.
संजय खांबेेटे : म्हसळा प्रतिनिधी
केंद्र सरकारने मे २०१६ पासून दारिद्ररेषेखाली (BPL) असणाऱ्या कुटुंबाना निशुल्क गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे, देशांत व राज्यांत स्वच्छ इंधन वापरांत वाढ घडून आणणे महीलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणे , महीला सशक्तीकरण करणे, प्रदूषण कमी करणे या मुख्य उद्देशाने व "स्वच्छ इंधन बेहत्तर जीवन" या घोष वाक्याने सुरु झालेली पंतप्रधान उज्वला योजना ही म्हसळा तालुक्यातील २ हजार ७८६ कुंटुबापर्यंत अद्यापही पोहचली नाही . दुसऱ्या बाजूने तालुक्यांत सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ग्रामीण व शहरी भागाकरिता जाने- फेब्र. महीन्यात केरोसिन वितरण झाले नसल्याची माहीती पुरवठा विभागाकडून मिळाली आहे.
वास्तविक पाहाता प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी पात्र BPL कुंटुबाची यादी राज्याचे मदतीने केंद्राने तयार केली व या योजनेची कार्यवाही भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालया-मार्फत सुरु केली.म्हसळे तालुक्यात शिधापत्रिकांची संख्या
तालुक्यात मागील महिन्यात केवळ ११ हजार लीटर केरोसीन वितरीत करण्यात आले . तर चालू माहिन्यात अद्यापही केरोसीन पुरवठा झाला नसल्याचे समजते.१८४५१ आहे त्यापैकी १५६६५ शिधापत्रिक धारकाना गॅस जोडण्या आहेत.२७८६ शिधापत्रिकाधारकाना अद्यापही गॅस कनेक्शन मिळाले नाही. केरोसीनचा अपुरा पुरवठा व गॅस सीलिंडरचे वाढते दर ही सबब पुढे करीत तालुक्यातीत दुर्गम भागातील व गरीब वर्गांतील सुमारे ३ते ४ हजार कुटुंबे फुकट व सहज मिळणाऱ्या सरपणाकडे आकर्षीत होत आहेत. त्यामुळेच तालुक्यांतील ग्रामिण भागांत पुन्हा एकदा चुली पेटू लागल्या आहेत.
"अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी २० आॅगस्ट २०१५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ज्यांच्याकडे एक किंवा दोन गॅसजोडण्या आहेत व सिलिंडर सवलतीच्या दरात मिळतात, अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना केरोसीन मिळणार नाही. तालुक्यात जाने. महिन्यात केरोसीन नियतन झाले नाही.वरीष्ठ कार्यालयाकडे मागणी नोंदविली आहे"
शरद गोसावी , तहसीलदार म्हसळा.
"ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडणी नाही अशा बिगर गॅसधारक शिधापत्रिकाधारकांना एक व्यक्ती दोन लिटर, दोन व्यक्ती तीन लिटर,तीन वा त्याहून अधिक व्यक्तींना चार लिटरबकेरोसिन मिळते.माहे जाने.२०२०मध्ये केरोसीन नियतन झाले नाही.
नथुराम सानप, पुरवठा अधिकारी म्हसळा.
"सर्वसामान्य लाभार्थ्यांना अवघ्या 100 रुपयांत केंद्राच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून गॅसचे वाटप करण्यात आले. तालुक्यातही सर्वच गावांमध्ये बहुतांश लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. चुलीवर जेवण करताना महिलांना त्रास होतो. त्यामुळे श्वासाचेही आजार जडतात. यातून गरीब महिलांचा सुटका व्हावी व त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा, यासाठी केंद्र सरकारनं ही योजना सुरू केली. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व महसुल विभागाने पुढाकार घेऊन उर्वरीत लाभार्थाना योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे"
प्रकाश रायकर , अध्यक्ष , भा.ज.प.म्हसळा तालुका.

Post a Comment