(म्हसळा प्रातिनिधी)
आठवी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आज रविवारी दि १६ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली .आठवी आणि पाचवी मिळून ५६२ विद्यार्थानी सहभाग घेतल्याचे गट शिक्षण अधिकारी संतोष शेडगे यानी सांगितले.यामध्ये पाचवीसाठी २५७ विद्यार्थी व आठवीसाठी २०५ विद्यार्थानी सहभाग नोंदविला.पाचवीसाठी साठी रा.जि.प.प्राथमिक शाळा मेंदडी, N.E.S.म्हसळा व पांगळोली हायस्कूल ही तीन सेंटर ठेवण्यात आली होती आणि आठवीसाठी अंजूमन हायस्कूल म्हसळा व P.N.P.हायस्कुल पाष्टी अशी दोन केंद्र ठेवण्यात आली होती. या परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत राज्यभर घेतली जाते.
" मागील वर्षापर्यंत तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी (म्हसळा) होत असत, तालुक्याची भौगोलिक रचना पहाता यावर्षी विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळावी म्हणून पाचवीसाठी तीन सेंटर व आठवी साठी दोन सेंटर ठेवण्यात आली"
Post a Comment