शैक्षणिक दृष्टया प्रगत म्हसळा तालुक्यातील ९९ शिक्षकांनी सामाजिक शास्त्र विषयाचे घेतले धडे : तालुक्यातील शिक्षणाचे रुप पलटणार.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतून जिल्ह्यांत म्हसळा तालुक्याची निवड.
"भारत सरकारच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयाने वर्गनिहाय अध्ययन निष्पत्ती तयार करण्याच्या सूचना NCERT यांना दिल्या होत्या.त्यानुसार NCERT ने प.अ सा.शास्त्र गणित ,इंग्रजी ,हिंदी आणि उर्दू या विषयांच्या प्रत्येक वर्ग निहाय अध्ययन निष्पत्ती तयार केल्या आहेत. केंद्रस्तरावरून होणाऱ्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी (National Achivement Survey) साठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा या मागचा मुख्य हेतू आहे"
गजानन साळुंखे, शिक्षण विभाग म्हसळा.

म्हसळा प्रतिनिधी
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(National Achivement Survey) 2017 चाचणीतील सामाजिक शास्र विषयामधील संपादणूक वाढविण्याच्या उद्देशाने राज्यातील सामाजिक शास्र विषयाचे इयत्ता ६ वी ते ८ वीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी अध्ययन समृद्धी कार्यक्रम सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात आला. याच कार्यक्रमानुसार म्हसळा तालुक्यातील ९९ शिक्षकाना शिक्षण परिषदेच्या माध्यमांतून सामाजिक शास्त्र विषयाचे धडे देण्यात आले.
पाहिल्या अध्ययन समृद्धी कार्यक्रम सत्रांत राज्यातील बीड, नंदुरबार, गडचिरोली, हिंगोली, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या नऊ जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये कार्यक्रम राबविण्यात आला.सन२०१९-२० मध्ये राज्यातील उर्वरित २७ जिल्ह्यातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम २०१७ मध्ये आघाडीवर असलेल्या २७ तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे.त्यानुसार म्हसळा तालुक्याने प्रगत तालुका म्हणून बहुमान मिळवलेला होता. त्याच निकषाने सामाजिक शास्त्र अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबवण्यास म्हसळा तालुक्याची रायगड जिल्ह्यातून एकमेव निवड झाली. त्यानुसार म्हसळा तालुक्यातील शिक्षकांचे दोन टप्प्यामध्ये दिनांक १७ व १८ फेब्रुवारी २०२० ला शाहीन उर्दू स्कुल येथे सामाजिक शास्र विषयाचे अध्यापन करणाऱ्या सर्व माध्यमाच्या शाळेतील तालुक्यातून एकूण ९९ शिक्षकांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये इतिहास, नागरिकशास्र व भूगोल विषयांत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे, त्याचबरोबर संपादणूक पातळी मध्ये वाढ करणे , विषयातील संकल्पना, संबोध अध्यापन पध्दती , तंत्रे आणि साधने अशा विविध घटकांवर राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक संतोष दौंड अधिव्या - ख्याता श्रीमती सोनल गावंड (विषय सहाय्यक डायट पनवेल ) यांनी सविस्तर व पारदर्शकपणे प्रशिक्षणार्थी शिक्षकाना मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इतर विषयाप्रमाणे सामाजिक शास्र विषयाचे देखील शिक्षकांना प्रशिक्षण मिळाल्याबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
सदरचे प्रशिक्षण कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे पं.स.म्हसळा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाहीन उर्दू शाळेचे प्राचार्य मुब्बशीर जमादार, केंद्रप्रमुख अनिल ठाकूर , बी आर आडे ,गजानन साळुंखे, सुनील पवार ,किशोर मोहिते प्रशिक्षण समन्वयक संदीप भोनकर , बोराडे व अन्य विषयसाधनव्यक्ती व BRC टीम यांच्या प्रयत्नातून सदरचा कार्यक्रम यशस्वी पणे संपन्न झाला.

Post a Comment