हापूस आंबा निर्यात करणाऱ्या म्हसळ्यात "बदामीआंबा" दाखल


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा बाजारात भाजीपाला मुबलक येत असतानाच फळांची सुद्धा मोठया प्रमाणात आवक होत आहे. सद्यस्थितीत बाजारात केळी,सफरचंद, संत्री,मोसंबी, पेरू, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, किवी, सिताफळ, अॅपल बोर,डाळींब इत्यादी फळे पोट भर आली आसतानाच आज तामीळनाडू, कर्नाटक मध्ये चांगल्या प्रमाणात होणारा "बदामी आंबा " (डुप्लीकेट हापूस) शकील फ्रूट मार्ट मध्ये दाखल झाला आहे. वास्तविक पहाता म्हसळा तालुक्यातून हापूसच्या हंगामात दररोज १५ ते २० टन हापूसची वाशी, पुणा, सातारा व सांगली भागात निर्यात होत असताना म्हसळ्यात दाखल झालेल्या या "बदामी आंब्याचे " (डुप्लीकेट हापूस)चे ग्राहक स्वागत करताना दिसत आहेत. शहरांत भाजी विक्रेत्यांएवढेच किमान १०-१२ फळ विक्रेते आहेत , बाजारांत फळांची आवक जास्त व ग्राहक कमी आसल्याने ग्राहकाना फळे स्वस्त मिळत आहेत.

"महाशिवरात्रीच्या सण -उपासाच्या दरम्यान फळे स्वस्त झाल्याने महीला वर्ग आनंदी आहे.महाशिवरात्रीला शंकराला आंब्याचा मोहर वाहण्याचे परंपरे सोबत या वेळी आंबा मिळणार आहे हे भाग्य आहे"
श्रीमती अश्वीनी पाटकुळे वहीनी, म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा