रोहा- श्रीवर्धन नगरपालीकेप्रमाणेच म्हसळा नगरपंचायतीत विकास कामे करणार.

संजय खांबेटे ; प्रतिनिधी म्हसळा

श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार,महाराष्ट्र राज्य क्रीडा, पर्यटन,राजशिष्टाचार खात्याच्या मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांनी विकास कामांचा आढावा सभा व तालुक्यातील जनतेसाठी जनता दरबार भरवुन पहिलाच तालुका दौरा केला.पाचगाव आगरी समाज सभागृहात आयोजित जनता दरबारात पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांचे शासकीय स्तरावर तहसीलदार शरद गोसावी यानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मी आमदार म्हणून निवडून येणे राज्यमंत्रीपद व रायगडचे पालकमंत्री पद :या मागे श्रीवर्धन मतदार संघ व म्हसळा करांचे श्रेय आहे. रोहा- श्रीवर्धन नगरपालीकेप्रमाणेच म्हसळा नगरपंचायतीत विकास कामे करणार. तालुक्यातील विविध राजकीय नेते,कार्यकर्ते व अनेक उपस्थित पदाधिका ऱ्यानी ना.आदिती तटकरे यांचे स्वागत केले.रायगड जिल्हा कृषी सभापती बबन मनवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका नेते अलिशेट कौचाली, तालुका अध्यक्ष समीर बनकर,सभापती उज्वला सावंत, नगराध्यक्षा जयश्री कापरे,उपनगराध्यक्ष सुहेब हळदे,गटनेते संजय कर्णिक,उपसभापती मधुकर गायकर,माजी सभापती छाया म्हात्रे,संदीप चाचले,नाझीमभाई हसवारे,महिला अध्यक्षा रेश्मा कानसे,फझल हलदे,नाझीम चोगले,संतोष पाटील, पी.आय.अश्वनाथ खेडकर,पाणी पुरवठा अभियंता गांगुर्डे, म.रा. वि.वि. कंपनीचे अभियंता वानखेडे , Rfo नरेश पाटील, सा.बा.उपअभीयंता श्रीकांत गणगणे, आदी मान्यवर उपास्थित होते.
उपस्थित लोकप्रतिनिधी व नागरीकांच्या माध्यमातून वीज, पाणी,रस्ते विकास,महिला बचत गट, एसटी स्थानक सुधारणा, पर्यटन विकास, खारबंदिस्ती आदि विषयावर शासकीय अधिकारी यांचे कडे चर्चा केली तसेच विविध प्रकारच्या प्रस्तावित कामांचे जनते मार्फत निवेदन स्वीकारले आणि योग्य वेळी विकास कामांबाबत पूर्तता करण्यात येणार असल्याचे आश्वाशीत केले.म्हसळा नगरपंचायतीची पाणी योजना तब्बल १० वर्ष रखडली या बाबत जिल्हा परिषदेचे मु.का.अ.याना संबधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जनता दरबारात ना.आदीतीताई तटकरे यांनी वीज,पाणी, रस्ते विकास,महिला बचत गट भवन , एसटी स्थानक सुधारणा,पर्यटन विकास, खारबंदिस्ती आदि विषयावर शासकीय अधिकारी यांचे कडे चर्चा केली तसेच विविध प्रकारच्या प्रस्तावित कामांचे जनते मार्फत निवेदन स्वीकारले आणि योग्य वेळी विकास कामांबाबत पूर्तता करण्यात येणार असल्याचे आश्वाशीत केले. यावेळी अलिशेट कौचाली यांनी शासकीय संकुल,रस्ते विकास,नानानानी पार्क,बाजरपेठ सुधारणा, पत्रकार भवन,जेष्ठ नागरिक भवन,कृषी विकास आदि कामांबाबत मागणी केली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा