म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे वैज्ञानिक व संगणकीय डिजिटल ज्ञान मिळावे व त्यांच्यातील बौद्धिक गुणवत्ता वाढविण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडी महाड खाडी स्वदेस फाउंडेशन मार्फत मिळणाऱ्या ई-लर्निंग साहित्य व एलइडी टी.व्ही., तसेच इयत्तेनुरूप अभ्यासक्रम राबवून आडी केंद्रात प्रथमच ई- लर्निंग शाळा ठरली आहे. शाळेसाठी साहित्य मिळवून देण्यासाठी आडी ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश गुणाजी म्हसकर, ग्रामपंचायत कमिटी, ग्रामसेवक एस.एल.म्हेत्रे व इतर काही दानशूर समाजसेवकांनी निधी उपलब्ध करून दिला तसेच शाळा ई- लर्निंग करण्यास केंद्र प्रमुख धोंडीराम सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक विजय निमजे व उपशिक्षक रोहिदास गायकवाड यांनी प्रयत्न केले.
ई- लर्निंग साहित्यामुळे विविध संकल्पना व शालेय स्तरावरील अभ्यासक्रम विद्यार्थाना उपयुक्त ठरतो असे मत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भोगल यांनी व्यक्त केले. या कामासाठी स्वदेस फाऊंडेशनचे प्रतिनिधी राकेश मोरे यांचे बहुमोल सहकार्य लाभले असून त्यांनी फाउंडेशन मार्फत लवकरात लवकर ई-लर्निंग साहित्य मिळवून दिले. शाळेला ई-लर्निंग साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक विजय निमजे यांनी स्वदेस फाउंडेशन व ग्रामपंचायत आडी महाड खाडी तसेच सर्व दानशूर समाजसेवकांचे आभार मानून भविष्यात देखील शाळेला वेगवेगळ्या प्रकारची मदत करावी असे आव्हाहन केले.
ई लर्निंग शाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रम वेळी शिक्षण प्रेमी संदीप गमरे, सुरेश पवार, शंकर चव्हाण, पांडुरंग चव्हाण, राजेंद्र चव्हाण, रुपेश भुवड, प्रगती महिला मंडळ आडी महाड खाडी व श्रीराम वरदान क्रीडा मंडळ आडी महाड खाडी मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment