म्हसळा करानो ऐका हो ऐका म्हसळा करांची वाटचाल स्वच्छते कडे सुरू

म्हसळा करानो "ऐका हो ऐका म्हसळा करांची वाटचाल स्वच्छते कडे सुरू : बोर्ड लागले लौकरच सुरू होणार घनकचरा व्यवस्थापन.

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत संकल्पनेला आता महाराष्ट्राने आणखी व्यापक स्वरुप देण्याचे ठरविले आहे. त्यातूनच आता राज्यातील नागरी भागात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यास सुरूवात होत आहे. त्याच माध्यमातून म्हसळा नगरपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून पाहिला हप्ता म्हणून रु २० लक्ष निधी उपलब्ध झाला आहे.या निधीच्या अंर्तगत म्हसळा नगरपंचायत हद्दीत अभियानास वाढता प्रतिसाद मिळावा म्हणून व स्वतापासून सुरवात व्हावी या उद्देशाने घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल.गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल,शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल, पर्यायाने देशही स्वच्छ राहिल. स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे या विषयी नगरपंचा-यतीमार्फत मोठया प्रमाणात प्रसीद्धी करण्यात येत आहे. संपूर्ण शहरासह नगरपंचायत हद्दींत भिंती रंगविणे, फ्लेक्स लावणे या विविध कामा अंर्तगत फार मोठा खर्च करण्यात आला आहे. ओला- सुका कचऱ्याचे कंपार्टमेंट असेलेले दोन टाटा टेंपो, कचरा क्रश करण्याचे मशीन नगरपंचायतीने घेतले आहेत. या व्यतीरीक्तपणे स्वच्छता व आरोग्य सुधारण्यासाठी शहरांतील ८ विहीरी पूर्ण पणे स्वच्छ, रिपेअर,कठडा उंचावणे ,परिसर स्वच्छ करणे अशी कामे याच निधीतून करण्यात येणार असल्याचे नगरपंचायत अर्थ विभागातून सांगण्यात आले.
संपूर्ण शहरांत स्वच्छतेबाबत जनजागृती करत असतानाच यापुढे दरदिवशी निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करून ओला व सुका कचरा वर्गीकरण व घनकचऱ्याची योग्य व शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून विल्हेवाट लावण्याबाबत भगराध्यक्षा जयश्री कापरे पदाधिकाऱ्याना विश्वासांत घेऊन योजना तयार करणार असल्याचे समजते.म्हसळा शहरांत स्वच्छतेविषयी जागरूकता निमार्ण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे हे पहिले रहाणार आसल्याचे सांगण्यात आले.
खालील अटींचे नगर पंचायत करणार पालन
१ ) कचऱ्याचे जागीच ओला -सुका करावे लागणार वर्गीकरण.
२ ) प्रकल्पासाठी GeM पोर्टल वरुन घ्यावी लागणार मशिनरी.
३) ओल्या कचऱ्याचे करावे लागणार कंपोस्ट खत.
४) सुक्या कचऱ्याचा पुर्न वापर अथवा विक्री करणे बंधनकारक

"म्हसळा नगरपंचायतीला स्वच्छ भारत अभियान (नागरी ) अंर्तगत जुलै २०१९ ला या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असताना स्वच्छता व आरोग्य विषयीच्या या महत्वाच्या प्रकल्पाला उशीर होत आहे, नगरपंचायतीकडे या व्यवस्थापनेसाठी योग्य जागाच नाही ही आजची स्थिती आहे"
अनिकेत पानसरे, शहरप्रमुख , म्हसळा शहर शिवसेना.

"स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतीच्या अनुषंगाने सवयींमध्ये बदल करणे.स्वच्छतेविषयी जागरूकता निमार्ण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे.नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता वाढविणे .भांडवली खर्च आणि ऑपरेशन आणि देखभाल यासाठी खाजगी पास्को, दिघी पोर्ट किंवा अन्य संस्थांच्या सहभागाने वातावरण निर्माण करुन शहरांत नागरी स्वच्छतेचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविणार , या प्रकल्पासाठी शहरातील नगरपंचायतीचे मालकीची जागा शोध ने सुरू आहे"
श्रीमती जयश्री कापरे, नगराध्यक्ष, नगर पंचायत, म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा