शिमग्या निमित्त रायगड मधून एसटीच्या जादा फेऱ्या ; आरक्षण बुकींग सुरु , चाकमान्यांचा प्रवास सुखकर

होळीनिमित्त रायगडातून एसटीच्या जादा फेऱ्या आरक्षण बुकींग सुरु , चाकमान्यांचा प्रवास सुखकर 

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
होळीसाठी नवी मुंबई, मुंबई, बोरिवली येथील असंख्य चाकरमानी जाणार आहेत या चाकरमान्यांचा प्रवास चांगला व्हावा यासाठी रायगडच्या एसटी महामंडळाकडून एसटीच्या २६ जादा फेऱ्या वाढविल्या आहेत . होळीच्या दोन दिवस अगोदर व होळीनंतर जाण्यायेण्यासाठी एसटीची सोय करण्यात आली असल्याचे विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले आहे . होळी हा बच्चे कंपनीपासून ज्येष्ठ मंडळींच्या पसंतीचा सण मानला जातो . कोकणात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो , गणेशोत्सानंतर चाकरमानी होळी सण साजरा करण्यासाठी कोकणात येतात . मुंबई सह परिसरातील शहरांमध्ये नोकरीनिमित्त असलेल्या चाकरमानी होळी सण साजरा करण्यासाठी येतात . यावर्षी होळी सण ९ मार्चला आहे . या सणासाठी अवघे १७ दिवस शिल्लक राहिले आहेत . होळीला गावी जाण्यासाठी चाकरमान्यांनी तयारी सुरु केली आहे . होळीसाठी येणाऱ्या प्रवाश्यांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी रायगड एसटी महामंडळाकडून होळी सणानिमित्त एसटीच्या २६ फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे . त्याचे नियोजनही केले आहे . होळी सणाच्या दोन दिवस अगोदर व होळीनंतर या फेऱ्या सुरु केल्या जाणार आहेत . जाताना १३ व येताना तेरा अशा २६ फेऱ्या चाकरमान्यांसाठी असणार आहेत . रायगड जिल्हयामध्ये माणगाव , श्रीवर्धन , रोहा , महाड , व रोहा तालुक्यात होळी सण जल्लोषात साजरा केला जातो . येथील चाकरमान्यांसाठी खास एसटीची सोय करण्यात आली आहे . मुंबई , बोरीवली , नालासोपारा येथील चाकरमान्यांसाठी या एसटीचा फायदा होणार आहे . चाकरमान्यांनी आतापासून बुकींगदेखील सुरु केली असल्याचे विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले . 

चाकरमान्यांना कोकणात शिमग्याच्या सणाला वेळेवर पोहचता यावे आणि सणाचा आनंद लुटून मुंबईकडे परत येत यावे यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेत जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतल्याने चाकरमानी आनंदात आहेत . या जादा रस्त्यांचा फायदा अचानकपणे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना होणार आहे . जादा गाड्या एसटी महामंडळ सोडणार असल्याने चाकरमान्यांनी आपापल्या गावाला जाण्यासाठी लागणारे आरक्षण करण्यासाठी रांगा लावल्या आहेत . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा