सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते सतये तिच्या मुखावर हरिहरेश्वर हे गाव आहे. नदीच्या दुसर्या (उत्तर) तीरावर श्रीवर्धन हे गाव आहे. कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तिर्थस्थान आहे. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, बक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे पाचशे मैलांचे दक्षिणोत्तर अंतर व ४८ मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला वारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात एकूण १०८ तिर्थस्थाने असली तरी प्रमुख तिर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख श्री हरीहरेश्वर माहात्म्य पोथीमध्ये आहे. हरिहरनावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरूप या दोन्होंचा संगम झाला आहे. रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्वाचे तिर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे. या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते. त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो. श्री शिवकालीन असावे असा अंदाज आहे. पंतु, बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे काळभैरवाचे आहे. याची एक आख्यायिका अशी आहे, की बळी राजाकडून तीन पावले भूमी घेताना हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशब्यांचे कुलदैवत आहे. हरिहरेश्वराचे देऊळ प्राचीन आहे. ते १७२३ मध्ये केल्याचे पुरावे आहेत, येथील सर्व आहेत. हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वांत महत्वाचे देऊळ बामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले. दुसरी आख्यायिका अशी आहे की, अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते, तेव्हा हरिहरेश्वरातील चार स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले. सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे. या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत. त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाच्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. मार्गावरील शे-दिडशे पायर्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असेही म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे पासूनच शिवभक्त श्री हरिहरेश्वराच्या दर्शनाकरीता दाखल होत असतात.
दक्षिण काशी श्री क्षेत्र श्री हरिहरेश्वर
Admin Team
0
Post a Comment