सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्र मंडळ मांदाड यांच्या वतीने मांदाड येथे "शिवजयंती" मोठ्या उत्साहात संपन्न

सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्र मंडळ मांदाड यांच्या वतीने गावातील ज्येष्ठ आणि युवा युवतींच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली "शिवजयंती"..

शिवरायांच्या विचारांची अस्मिता नव्या पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजन करण्यात आलेल्या  वक्रुत्व स्पर्धेस शाळकरी मुलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद..

मांदाड - ( प्रतिनिधी-  केशव पिठे )
तळा तालुक्यात आजमितीस अनेक गावात मंडळातर्फे किंवा काही घरामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येते. तसेच उपरोक्त मंडळा तर्फे गावात अनेक लोकोपयोगी उपक्रम वर्षभर राबवले जातात. लोकांच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा हुंकार जागृत करणारे रयतेचे राजे, कुशल प्रशासक व आदर्श राज्यकर्ते, छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२० रोजी, मांदाड गावात उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. शिवरायांच्या विचारांची अस्मिता जागा करणारा सामूहिक "पोवाडयाचे" गायन करण्यात आले. दिवसभरात लहान थोरान पासून ते ज्येष्ठांनी शिवरायांच्या प्रतिमेस नतमस्तक होऊन अभिवादन केले. संध्याकाळी गावातील "पारावर" शाळकरी मुलांसाठी वक्रुत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन शिवरायांवर विचार मांडून संबोधित केले. विद्यार्थ्यांनी आपल्या बोलीतुण राजमाता जिजाऊ यांनी घडवलेले संस्कार, शिवरायांचा जन्मापासून ते लढाया, सहकाऱ्यांन सोबत असलेले नातं, नीती, ध्येयनिष्ठता, गणीमीकावा आणि शिवरायांचे विचार मांडले. उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांनी आपल्या मनोगता मधून शिवरायांचे विचार मांडून उपस्थित शाळकरी मुलांना प्रबोधीत केले. सदर शिवजयंतीस मांदाड ग्रुप ग्रामपंचायत मांदाडचे विद्यमान सरपंच मा. तानाजी कालप यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी भेट देऊन शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा