म्हसळा शहरात जनजागृतीसह राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा.

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरात न्यू इंग्लीश स्कुल, वसंतराव नाईक कॉलेज, अंजुमन हायस्कूल च्या विद्यार्थ्यानी पथ नाटय, पोवाडा अशा जनजागृतीसह राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा केला.लोकशाही व्यवस्‍थेत मतदार हा महत्त्‍वाचा घटक असतो. अर्थात लोकशाही व्यवस्‍थेची मतदार ताकद असते. त्यामुळेच जागरूक मतदार हे प्रगत लोकशाहीचे द्योतक मानले जाते. निवडणूक आयोगाच्या ६१व्या स्‍थापना दिनी २५ जानेवारी २०११ पासून राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. अर्थात हा मतदानाचा अधिकार मिळाल्याचा उत्‍सव साजरा करण्याचा दिवस आसल्याचे तहसीलदार शरद गोसावी यानी सांगितले यावेळी नायब तहसीलदार के.टी. भिंगारे, न्यू इंग्लीश स्कूल चेप्राचार्य काशिनाथ जाधव, अंजुमन चे प्राचार्य विजापुरे सर, एस्.के.पाटील, पोपटराव बोराटे, प्रशांत शेळके, कल्पना शेट, माधवी पाटील, एन.एस. कदम,मंडळ अधिकारी दत्ता कर्चे, गोवींदराव चाटे, श्रीमती तृप्ती साखरे, तलाठी कैलास पाटील, पूनम कारंडे, उभारे,वावढळ , ज्युनी. कॉलेजचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.देशातील सर्व मतदान केंद्रांवरून १८ वर्षे व त्यावरील वयाच्या लोकांना मतदान व्यवस्‍थेत सामावून घेणे. त्यांच्या नावाचा मतदार यादीत समावेश करणे आणि त्यांना ओळखपत्र देणे ही कामे आयोगाच्या प्रक्रियेतून केली जातात असे या वेळी सांगण्यात आले.

"भारताला स्‍वातंत्र्य मिळाल्यानंतर २५ जानेवारी १९५० रोजी एक स्‍वायत्त संस्‍था म्‍हणून निवडणूक आयोगाची स्‍थापना झाली. देशात निपक्ष व पारदर्शी वातावरणात निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे कार्य आहे. त्याचबरोबर नवमतदारांना मतदान व्यवस्‍थेत सामावून घेणे. त्यांना ओळखपत्र देणे, त्यांच्यात मतदानाबद्दल जाणीव जागृती निर्माण करणे आदी कार्येही आयोग करत असते."
के.टी. भिंगारे. निवासी नायब तहसीलदार, म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा