फोटो- म्हसळा शहरातील बौद्धवाडी येथे फुटलेल्या पाईपलाईन मधून पाणी वाया गेल्याचे दिसत आहे.
संजय खांबेेेटे : म्हसळा प्रतिनिधी
संजय खांबेेेटे : म्हसळा प्रतिनिधी
पाणी टंचाई ग्रस्त म्हसळा नगर पंचायतीत शहरातील नागरिकांना एप्रिल ते जून या तीन महिन्यात भीषण पाणी टंचाई होत असते, केवळ ३ महीन्यात रु१५ते २० लक्ष पाणी पुरवठ्यासाठी खर्च केले जातात, आज मात्र लाखो लीटर पाणी वहात जात असल्याच्या घटनाना नगरपंचायतीला सामोरे जावे लागते.
शहरात होत असलेला पाणी पुरवठा सुरळीत व योग्य व्हावा यासाठी नगरपंचायतीने योग्य उपाययोजना करण्याऐवजी नगरपंचायतीच्या हलगर्जी पणामुळे शरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळत आसल्याच्या घटना घडतात. आदीवासी वरून पाण्याच्या टाकीतून वितरण होणाऱ्या लाईनला रस्त्यांत मोठे लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले स्थानीक नागरीकानी नगरपंचायतीला तात्काळ माहीती देऊनही तात्काळ दुरुस्ती न करता खड्डा खोदण्यासाठी कामगार मिळत नसल्याने अथवा या महत्वपूर्ण कामाकडे अधिकारी कर्मचाऱ्यानी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्यामुळे पाण्याचे नुकसान झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

"नगर पचायतीने शहरांतील भितीवर पाण्याचे महत्व व अपव्यय टाळण्यासाठी जनजागृतीसाठी अनेक घोषवाक्य लिहू नही नगरपंचायत अधिकारी- कर्मचारी निष्काळजी व बेपर्वाईने का वागतात असा सवाल होत आहे"
-दुष्यंत मोरे, म्हसळा.
Post a Comment