म्हसळ्यातील व्यापार्‍यांवर बहिष्कार टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी

फोटो -म्हसळा शहरातील हिंदू व्यापार्‍यांवर बहिष्कार टाकणार्‍यावर कारवाई व्हावी व 27 फेब्रुवारी रोजी सीएए,एनआरसी कायद्या बद्दल समर्थन रॅली काढण्या बाबत म्हसळा तालुका हिंदू संघटना दिसत आहे.

म्हसळा तालुका हिंदू संघटना आक्रमक:27 फेब्रुवारीला सीएए,एनआरसी समर्थनार्थ रॅलीचे आयोजन: व्यापार्‍यांवर बहिष्कार टाकणार्‍या समाज कंटकांवर कारवाई करण्याची मागणी 

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरातील हिंदू व्यापार्‍यांवर बहिष्कार टाकणार्‍या समाज कंटकांवर कारवाई करण्यात यावी व सीएए व एनआरसी समर्थनाबद्दल म्हसळा तालुका हिंदू संघटना आक्रमक झाली आहे.व्यापार्‍यांवर बहिष्कार टाकणार्‍या समाज कंटकांवर कारवाई व्हावी व सीएए,एनआरसी समर्थनात 27 फेब्रुवरी रोजी भव्य रॅली काढणार असल्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.म्हसळा तालुक्यातील फक्त हिंदू समाजातील व्यापर्‍यांना त्रास देण्याचे व सीएए, एनआरसी कायद्या बद्दल हिंदू समाजात भ्रम निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम काही समाज कंटक यांच्या मार्फत सुरू आहे.हिंदू समाजातील व्यापार्‍यांवर बहिष्कार टाकून दोन समाजात तेढ निर्माण करणार्‍या समाज कंटकांवर कारवाई करण्यासाठी व सीएए,एनआरसी कायद्या बद्दल हिंदू समाजात जागृतता करण्यासाठी गुरवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी म्हसळा शहरातील राधा कृष्ण मंदिरात तालुक्यातील 84 गाव व 120 वाड्यांवरील हिंदू समाज अध्यक्षांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेमध्ये म्हसळा तालुका हिंदू समाज संघटना अध्यक्ष महादेव पाटील, म्हसळा शहर हिंदू समाज अध्यक्ष सुभाष उर्फ भाऊ करडे, भाजपा नेते कृष्णा कोबनाक,राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख समीर बनकर,भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर,माजी सभापती रवींद्र लाड,शिवसेना माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के,शेकाप चिटणीस संतोष पाटील,उप सभापती मधु गायकर,हॉटेल संघटनेचे अध्यक्ष शैलेष पटेल,नगर पंचायतीचे गटनेते संजय कर्णिक,कुंभार समाज अध्यक्ष सुनील अंर्जलेकर,व्यंकटेश सावंत,किरण पालांडे,संजय खताते व तालुक्यातील 84 गावातील विविध हिंदू समाजाचे अध्यक्ष यांच्या सहित अनेक मान्यवर उपस्थित होते.बहुजन क्रांती मोर्चा तर्फे 29 जानेवारी रोजी सीएए,एनआरसी विरोधात भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते,हे भारत बंद सक्तीचे नसून जो या कायद्याला विरोध करतो त्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन कायद्याचा विरोध करावा. असे आवाहन करण्यात आले असताना देखील म्हसळा शहरामध्ये सीएए,एनआरसी विरोधात भारत बंद मध्ये सामिल झालेल्या जमावा पैकी काही जणांनी संपूर्ण म्हसळा शहरात फिरून जे दुकाने सुरू होती, त्यां दुकानात जाऊन त्या व्यापाऱ्यांना सक्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले.हे समाज कंटक एवढ्यावर न थांबता जे दुकाने सुरू होती त्या दुकान मालकांचा फोटो,दुकानाचे नाव व इतर माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करून त्यांच्या दुकानातून काहीही खरेदी करू नका असा फतवा काढत बहिष्कार टाकण्यात आला.याबाबत म्हसळा पोलिस ठाण्यात तीन तक्रार अर्ज देखील करण्यात आली आहे.हिंदू समाजातील व्यापार्‍यांवर सोशल मीडिया मार्फत बहिष्कार टाकणार्‍या समाज कंटकांवर कारवाई व्हावी व भारत सरकारने विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समर्पित केलेल्या सविधांनाच्या चौकटीत राहून देशाच्या दोन सर्वोच सभागृहात सीएए,एनआरसी कायदा मंजूर केला आहे.या कायद्याच्या समर्थनात 27 फेब्रुवारी रोजी म्हसळा तालुका हिंदू समाजा तर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे तहसिलदार यांना देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा