संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यात व शहरांत महावितरणने वीज चोरीची मोहीम हाती घेतली आहे. त्यावेळी शहरात व तालुक्यांत वीज चोरीची ३५ पप्रकरणे उघडपणे समोर आली आहेत.यामध्ये अनेक अफलातून प्रकार दिसून आले. हे प्रकार पाहून अधिकारीही सुध्दा थक्क झाले. हे ‘फंडे’ वापरुन वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांना महावितरणने लाखोंचा दंड ठोठावला. तसेच काही अंशी वीज पुरवठा सुद्धा खंडित केल्याचे सांगण्यात आले.नोव्हेंबर महिन्यात वीज चोरी विरोधात धाडसत्र राबवत ही कारवाई सुरु करण्यात आली. उपकार्यकारी अभियंता सतीश वानखेडे यांच्या मार्गदर्शनात आणि सहाय्यक अभियंता धिरज बिराजदार याच्या नेतृत्वात महावितरण भरारी पथक यांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत ६८ हजार ७७६ युनिट म्हणजेच ११ लक्ष २९ हजार ९३१ रुपयापेक्षा जास्त रुपयाची वीज चोरी होत असल्याचे उघड करण्यात आले आहे.यामध्ये एकूण ३५ ग्राहकांवर कारवाई केली आहे घरगुती विज वापर करणारे ३४ व कृषी साठी विज वापर करणारा १ ग्राहक आसल्याचे सहाय्यक अभियंता धीरज बीराजदार यानी सांगितले.
विज चोरीसाठी ग्राहकानी वापरले पुढील फंडे
सी. टी. मध्ये रेझिटन्स बसवून वापर केलेल्या विजेच्या तुलनेत अत्यल्प देयक घेण्यासाठी वापर,महावितरणकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या विजेचे मोजमाप करण्यासाठी मीटरमध्ये सी. टी. (करंट ट्रान्झिस्टर) बसवण्यात,सी. टी. (करंट ट्रान्झिस्टर) ची वायर कट करून वीज घेतली जाते. यामध्ये मीटरला मागून व्होल पाडून मीटर बंद पाडण्यात येते,सी. टी. वायर कट विजेचे मोजमाप करण्यासाठी मीटरमध्ये बसविण्यात आलेल्या सी. टी. (करंट ट्रान्झिस्टर) ची वायर कट करून वीज घेतली जाते.महावितरणकडून आलेला वीज पुरवठा मीटरमध्ये घेतला. विशिष्ट पद्धतीने कारागिरी करून सीटी बायपास करण्यात आली. यात वायर बाहेरून कट करून वीज घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
"म्हसळा उपविभागात विजचोरीचे प्रकार वाढले आहेत. मीटर ला सील करणे, सर्व ग्राहकांचे मिटर तपासणे, मीटर घरामध्ये (आतील भागात ) असतील ते खुले अगर दर्शनी भागात लावणे ही प्रक्रीया शिघ्र व गंभीरपणे करण्यात येणार आहे."
धीरज बिराजदार, सहाय्यक अभियंत , म.रा.वि.वि. कंपनी. उप विभाग ,म्हसळा.
"भविष्यात विजचोरीकडे प्राधान्य देण्यात येणार आहे.नियमानुसार तडजोड रकमेचा व वीजचोरी केलेल्या रकमेचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 कलम 135 नुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे."
श्री. सतीश वानखेडे , उप कार्यकारी अभियंता, म्हसळा

Post a Comment