राज्यमंत्री मा. आदिती सुनील तटकरे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
राज्यमंत्री कु. आदिती सुनिल तटकरे यांनी उद्योग, खनिकर्म, पर्यटन, क्रीडा, युवक कल्याण, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, राजशिष्टाचार या विभागाचा कार्यभार स्विकारला.
आज दुपारी 3 वाजता मंत्रालयात दालन क्र.2, तळमजला, मुख्य इमारत येथील मंत्री कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करीत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी आमदार शेखर निकम, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार संजयराव कदम, आई वरदा तटकरे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 यावेळी कु. आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यमंत्री म्हणून मोठी जबाबदारी मला देऊन जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. या जबाबदारीतून जनतेचे काम प्रामाणिकपणे करुन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न असेल. युवकांच्या कल्याणासाठी  आणि राज्याच्या विकासासाठी काम करेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा