आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली श्रीवर्धन नगरपालिका घनकचरा प्रकल्पाला भेट

श्रीवर्धन (विजय गिरी ) स्थानिक स्वराज्य संस्था 
कोकण विधान परिषदेचे सदस्य  युवानेते आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपालिका हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देवून कामाचा आढावा घेतला .यावेळी त्यांच्या सोबत
नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, स्वच्छता वैधक व आरोग्य सभापती बबनराव चाचले व नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. घनकचरा विघटन करणे, घनकच-या पासून कंपोष्ट तयार करणे याबाबतीत प्रत्यक्ष पाहणी करून श्रीवर्धन नगरपालिका घनकच-याच्या बाबतीत जी दक्षता घेत त्याबद्दल नगरपालीका प्रशासन व संपुर्ण टिमचे आमदार मा अनिकेतभाई तटकरे यांनी कौतुक केले. तसेच घनकचरा कामांत अजुन चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन करुन त्या कामाला गती कशा प्रकारे देता येईल, ओला कचरा, सुखा कचरा, प्लॅस्टिकमुक्त कचरा या बाबतीत जनते मध्ये अधिक जागरुकता निर्माण करून घनकचरा व्यवस्थापन पुर्णपणे यशस्वी करूया. श्रीवर्धन शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने आमदार मा अनिकेतभाई तटकरे यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा