तालुक्यातील शासकीय रुग्णसेवा दर्जेदार मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु - जिप सदस्य बबन मनवे


म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर

तालुक्यातील जास्तीतजास्त लोकवस्ती ग्रामीण भागात वास्तव्यास आहे. येथील गरीब गरजु घटकाला सध्याच्या स्थितीत मिळत असलेली शासकीय रुग्ण सेवा सुमार दर्जाची आसुन ती नावानुसार प्राथमिकच आहे. नवीन आघाडी सरकारच्या समान कार्यक्रमाचे धोरणा नुसार म्हसळा तालुक्यातील शासकीय रुग्णसेवा दर्जेदार मिळण्यासाठी आमचे यशस्वी प्रयत्न असतील असे मनोगत म्हसळा तालुका रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य बबन मनवे यांनी संपन्न समिती सभेत व्यक्त केले. म्हसळा तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, तीन प्राथमिक आरोग्य केंद्र, तीन उपकेंद्र आणि पाभरे,आंबेत येथील मोठया लोकवस्तीचे गावात जिल्हा परिषदेचे अखत्यारीत दवाखाना कार्यान्वित आहेत.म्हसळा शहरात ग्रामीण रुग्णालय कार्यान्वीत झाला असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज गेली तीन वर्षे ठप्प आहे हा आरोग्य केंद्र पाभरे येथे स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव शासनाचे फायलीत बंद आहे तो स्थलांतरित करून लवकरच कार्यान्वित करण्यासाठी तसेच तालुक्यात मिळत असलेली सुमार दर्जाची रुग्णसेवा दर्जेदार मिळावी यासाठी आमचे प्रयत्न असतील असे मनोगत अध्यक्ष बबन मनवे यांनी व्यक्त केले.याकामी उद्योग,पर्यटन आदी खात्याच्या राज्यमंत्री ना.आदीतीताई तटकरे यांचे माध्यमातून योग्य ती कार्यवाही चालु आहे असे मनवे यांनी सभेला आश्वाशीत केले.सभेला सभापती उज्वला सावंत,नगराध्यक्षा जयश्री कापरे,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणेश कांबळे,प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे,तालुका शिक्षण अधिकारी संतोष शेटगे,वैद्यकीय अधिकारी सागर काटे,वैद्यकीय अधिकारी दीपिका पाटील,समिती सदस्य डॉ.राऊत,सतीश शिगवण, प्रकाश गाणेकर,रामदास रिकामे,अनंत पवार,अशोक काते,विस्तार अधिकारी पांडुरंग हिंदोळा, शिरसाठ,परिचारिका श्रीमती शिंदे, धनावडे,आर.जी.पाटील,एस एस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.सभेच्या सुरवातीला रुग्ण कल्याण समितीने देशात व राज्यातील विविध दुःखद घटनांबाबत श्रद्धांजली अर्पण केली.नवीन स्थापित महाराष्ट्र राज्य सरकारचे,नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि सर्व मंत्रिमंडळ, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि खास करून श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार आदितीताई तटकरे यांना राज्यमंत्री पद मिळाल्याने सर्वांचे अभिनंदन करून ठराव करण्यात आला. उपस्थित समिती सदस्यांनी तालुक्यातील आरोग्य सेवा बाबत सभेत अनेक प्रश्न उपस्थित करून असणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी चर्चेत सहभाग नोंदवला.उपस्थितांचे स्वागत सभा सचिव तथा आरोग्य अधिकारी डॉ.गणेश कांबळे यांनी केले. अध्यक्ष बबन मनवे यांनी सर्वांचे धन्यवाद मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा