संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
हल्ली म्हसळा बाजारात भाजीपाला मुबलक येत असतानाच फळांची सुद्धा मोठया प्रमाणात आवक होत असतानाच म्हसळा S.T. स्टँड, ग्रामिण रुग्णालय परिसरांत आलेल्या फळ विक्रेत्यानी फळ खवख्यांची रेलचेल केली आहे.सफरचंद, संत्री,मोसंबी, पेरू, सिताफळ, अॅपल बोर,डाळींब इत्यादी फळे पोट भर आली आहेत. शहरांत रु१०० ते १५० प्र.किलो या दराने असणारी ही फळे ह्या ठीकाणी मात्र रु १०० मध्ये सव्वा किलो या दराने मिळत असल्याने फार मोठया प्रमाणात येथे ग्राहकांची गर्दी असते. सध्या सफरचंदाचे बरोबरीने सिताफळ व पेरूला बाजारात जोरदार मागणी आहे, द्राक्ष बाजारांत आली परंतु ग्राहकांसाठी ती आंबट आहेत व ती रु१०० प्रती किलो आहेत. असे संबधीत व्यापाऱ्यानी सांगितले.
म्हसळा S.T. स्टँड, ग्रामिण रुग्णालय परिसरांत बसणारे व्यापारी अशोक गोसावी हे मूळचे सांगली जिल्ह्यातले आहेत ग्रामिण रुग्णालय व या परिसरांत असणाऱ्या दवाखान्यामुळे व S.T. स्टँडचे गर्दीमुळे फळांची मागणी वाढत आहे, शहरातील फळ विक्रेत्यांपेक्षा दर सुद्धा कमी असल्याने फळाना मागणी अफाट आहे असे गोसावी यानी सांगितले.रुग्ण व गरोदर स्त्रियांसाठी अन्य काही खाण्यापेक्षा फळ आहार सर्वात छान असतो असेही या भागातील डॉक्टर मंडळी सांगतात याला गोसावीनी पुष्टी दिली. ह्यामुळे शी ग्रिन्हाईकांच्यात वाढ होत असावी
हैद्राबाद येथील नँशनल इन्स्टीट्यूट आँफ न्यूट्रीशन मध्ये 14 फळांचा एक अभ्यास केल्या गेला. त्यावेळी त्यांनी जो निष्कर्ष काढला त्यानुसार सर्व फळांच्या तुलनेत सर्वात जास्त अँन्टीआँक्सीडन्ट्सचे प्रमाण पेरुमध्ये आढळले.
100 ग्रँम पेरुमध्ये 500 मिलीग्रँम अँन्टीआँक्सीडन्ट्स आढळले तर 100 ग्रँम सफरचंद मध्ये 135 मिलीग्रँम अँन्टीआँक्सीडन्ट्स आढळले. त्यामुळे पेशींना DAMAGE होण्यापासून पर्यायाने कर्करोगापासून आपणाला दूर ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य पेरु करतो.
जाहिरात
सफरचंद व पेरु या दोन्ही फळांमधील तुलनात्मक मिनीरल्स पुढील प्रमाणे
कँल्शीअम – सफरचंदपासून 6 मिलीग्रँम तर पेरु पासून 18 मिलीग्रँम,लोह - सफरचंदपासून 0.12 मिलीग्रँम तर पेरु पासून 0.26 मिलीग्रँम,मँग्नेशिअम - सफरचंदपासून 5 मिलीग्रँम तर पेरु पासून 22 मिलीग्रँम,फाँस्फरस - सफरचंदपासून 11 मिलीग्रँम तर पेरु पासून 40 मिलीग्रँम,पोटँशिअम - सफरचंद पासून 107 मिलीग्रँम तर पेरु पासून 417 मिलीग्रँम.(प्रमाण १०० ग्रॅम.)
डॉ. सुधीर चोचे, म्हसळा.
Post a Comment