किशोर पितळे : तळा
तळा तालुक्यातील नवसाला पावणारी आणि तळेवासियांची श्रध्दास्थान असलेली श्री चंडिका ग्रामदेवी उत्सव सोहळा पौष चतुुुर्दशी व पौणिमा ९/१० जानेवारी २०२० रोजी आयोजन करण्यात आले होते तळा येेेथील बारा वाड्यांचे हे ग्रामदेवता मंदीर शहरांतील अठरा पगड जाती या मंदीर सोहळ्यात समाविष्ट होत असतात. यावेळी यजमान पदाचा मान वडाचीवाडी मोहीतेआळी यांना मिळाला. तर श्री चंडिका देवी पूजनाचा मान, पुर्वापार सोनार समाजाचा असल्याने सौ. व श्री. सुनील पितळे. गणेश पुजनाचा मान वडाचीवाडी ग्रामस्थ सौ. व श्री. कुरपाणे यांच्या हस्ते करण्यात आली ता.९जानेवारी रोजीसकाळी १०वाजता देवीची गादी श्रीकांत वेदक यांच्या घरापासून मंदीरापर्यत भजन ढोल ताशा च्या गजरात वाजत गाजत नेली जाते. दुपारी विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ भोईरवाडी याचे संगीत भजन,५/७डॉ. संतोष झापकर(तळा) अजित कडकडे यांचे शिष्य यांचा शास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम, रात्रौ.९/११ ह.भ.प.ताजबुद्दीन शेख महाराज (औरंगाबाद) यांचे वारकरी संप्रदायाचे किर्तन.रात्री वडाचीवाडी मोहीते आळी यांचे भजन ता. १० पहाटे ४.३० काकडारती श्री देवीचा अभिषेकपुजाअर्चा नवचंडी होमहवन सौ. व श्री विशाल सुरेश मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. पौराहीत्य संजय केळकर गुरूजी सहकारी रेवदंडा यांनी केले षोडशोपचार पुजा आणि सर्व गावातुन वाजत गाजत येणारे दिंडीपालखी सोहळे हे जणु गावातील आगळी वेगळी पर्वणीच ठरते या धार्मिक सोहळा महीला सह अबाल वृद्धांंना देखील माहेरवाशीणीना पर्वणीच वाटते. यामुळे संपुर्ण परिसर भक्तीमय होउन गेले होते. मंदिरासमोर भक्तांसाठी भव्य प्रांगणात उभारलेले मंडप भक्तांच्या स्वागतासाठी स्वयंसेवक दर्शनासाठी लागलेल्या भाविकांच्या रांगा देवीच्या मिळालेल्या दर्शनामुळे त्यांच्या चेहऱ्या वरील प्रसन्नता यावेळी जाणवत होती देवीच्या दर्शनानंतर भाविकांना महाप्रसादाची सोय केली जाते या महाप्रसादाला असंख्य भाविक आवडीने आनंदाने येतात या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी तळा शहरातील शाळा महाविद्यालय आयटीआय काॅलेज येथील विद्यार्थी शिक्षक वर्ग व्यापारी डाॅक्टर्स पत्रकार प्रतीष्ठीत मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भाविकांची श्रध्दा आणि भक्ती यामुळे सारा परिसर भक्तीमय होऊन गेला होता यावेळी ह भ प किर्तनकार मुस्लीम धर्माचा असल्याने हे वारकरी किर्तनाचा श्रवणाचा लाभ अनेक श्रोत्यांनी घेतला हे खास आकर्षण ठरले होते.पुर्वापार या मंदिरात साऱ्या वतनदारांना मिळत असलेला पुजेचा अधिकार लाभ वतन जतन करुन ठेवणारी धार्मिकता वपावित्रता जातीय सलोखा जपणारे हे श्री चंडिका भवानी माता यांचे मंदिर ट्रस्ट आहे अशा भव्य दिव्य उत्सव सोहळाची मोठ्या उत्साहात सांगता झाली.
Post a Comment