शासकीय नोकरीतील आरक्षणाचा शासन निर्णय सुधारित करावा यासाठी क्रीडा मंत्र्यांना दिले निवेदन

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
शासकीय नोकरीत खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा शासन निर्णय बदलून त्या मध्ये एशियन बीच गेम्स या अधिकृत स्पर्धेचा समावेश करण्याचा सुधारित शासन निर्णय घेण्यात यावा यासाठी महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा राज्यमंत्री नामदार आदितीताई तटकरे यांची भेट घेतली. ऑलिंपिक कौन्सिल ऑफ आशिया दर चार वर्षांनी या स्पर्धांचे आयोजन करते, एशियन बीच गेम्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय ऑलंपिक महासंघ निवड चाचणी व संघ पाठवण्याचे काम करते. सदर स्पर्धा या आशियातील आशियाई स्पर्धे नंतर सर्वात मोठी दुसरी स्पर्धा आहे असे असले तरी ५ टक्के नोकरी आरक्षणाच्या शासन निर्णयात ऑलिंपिक गेम्स, पॅरा ओलंपिक गेम्स,आशियाई गेम्स,कॉमन वेल्थ गेम्स,साऊथ एशियन गेम्स,जागतिक स्पर्धेचा समावेश आहे परंतु आशियाई बीच गेम्स स्पर्धेचा समावेश नसल्याने महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना या आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता याबाबत क्रीडा मंत्र्यांना निवेदन देण्यात आले यावेळी शासन स्तरावर निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले या आंतर राष्ट्रीय खेळाडू हेमंत पयर, श्री छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू सागर सावंत, आंतर राष्ट्रीय खेळाडू तुषार जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा