सर्वसामान्य माणूस व महसुल विभाग यांचे दृढ नाते - अमित शेडगे, प्रांताधिकारी श्रीवर्धन

तहसिल कार्यलयात चावडी वाचन कार्यक्रम संपन्न 

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

देशातील सर्वसामान्य व्यक्तीला सरकारने विविध प्रकारच्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत .त्या योजना द्वारे जनतेचे हित साधण्याचे उत्तरदायित्व प्रशासनातील व्यक्तींचे आहे .प्रशासन व सामान्य माणूस यांच्यातील संवाद वाढला  पाहिजे  .महसुल विभाग व सामान्य जनता यांचे नाते दृढ आहे .असे प्रतिपादन अमित शेडगे यांनी केले .
तहसिल कार्यालय श्रीवर्धन आयोजित चावडी वाचन कार्यक्रम प्रसंगी प्रांतांधिकारी अमित शेडगे यांनी उपस्थित शेतकरी वर्गाशी संवाद साधला .त्या प्रसंगी बोलतांना त्यांनी शेडगे यांनी शेतकरी अडीअडचणी व महसुल प्रशासन या विषयी मार्मिक भाष्य केले .आजचे युग आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे .आज संगणकाच्या मदतीने आपण हवी असलेली माहिती क्षणात उपलब्ध होत आहे .आपल्या देशात शेतकरी वर्ग हा महत्वाचा घटक आहे .शेतकऱ्यांचा महसुल विभागाशी सदैव संबध येतो .उतारा , सातबारा , पीक कर्ज , पीक विमा , विविध शासकीय योजना , नुकसानीचे पंचनामे या सर्व बाबी महसुल विभागाशी निगडित असतात .त्या कारणे तलाठी व ग्रामसेवक या दोन्ही घटकांच्या समवेत महसूल विभाग काम करतो .शेतकऱ्यांना कागद पत्रा मध्ये कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी आपण घेऊ असे शेडगे यांनी सांगितले .सातबारा संदर्भात शेतकरी वर्गाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्रांताधिकारी यांनी उत्तरे दिली .श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी यांनी राजस्व योजनेत असलेल्या विविध बाबींची माहिती उपस्थित शेतकरी वर्गाला दिली .चावडी वाचन ही संकल्पना काय आहे .व तिचा सर्वसामान्यांना व्यक्तीला काय फायदे आहेत याची सविस्तर माहिती दिली .श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांला शासकीय योजनांचा लाभ मिळेल या साठी तालुका प्रशासन सदैव तत्पर आहे .चावडी वाचन कार्यक्रमा द्वारे शेतकरी वर्गाशी आगामी काळात विविध ठिकाणी जाऊन सवांद साधला जाईल असे सचिन गोसावी यांनी सांगितले .सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील 10 शेतकऱ्यांना उतारे वाटप करण्यात आले .कार्यक्रमासाठी नगरसेवक प्रीतम श्रीवर्धनकर ,नायब तहसीलदार अनंत कांबळे , अर्जुन भगत व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मंडलाधिकारी देऊळगावकर यांनी केले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा