एस टी चालक सतीश देसाई यांचे उपोषण सुरू


एस टी चालक सतीश देसाई यांचे उपोषण सुरू  ; आगार व्यवस्थपकांनी मानसिक छळ केल्याचा आरोप  : एस टी  कर्मचारी संघटना आक्रमक 

म्हसळा  प्रतिनिधी : अरुण जंगम

श्रीवर्धन एस टी आगारातील चालक सतीश देसाई यांनी आगार प्रमुख एम जी जुनेदी यांच्या छळाला कंटाळून प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे .देसाई हे श्रीवर्धन आगारात गेल्या ७ वर्षांपासून चालक पदी कार्यरत आहेत .आगार व्यवस्थपकांनी कोणतेही वाजवी कारण नसताना देसाई यांची कामगिरी बंद केली .कामगिरी बंद केल्याने देसाई यांनी आर्थिक व मानसिक त्रास झाला असे देसाई यांनी सांगितले .माझे झालेले आर्थिक नुकसान मला भरून मिळावे व संबधित आगार व्यवस्थापकवर तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी सतीश देसाई उपोषणाला बसले आहेत .देसाई यांच्या उपोषणाला महाराष्ट्र एस टी कामगार सेना व श्रीवर्धन तालुका शिवसेना पक्ष यांनी पाठींबा दिला आहे .शिवसेना तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर ,नगरसेवक प्रीतम श्रीवर्धनकर  , कामगार सेना विभागीय सचिव विजय केळकर व मानवाधिकार संघटनेचे सुरेश करडे  यांनी उपोषण कर्ते यांच्याशी संवाद साधला आहे .शिवसेना पक्ष कामगारांवरील अन्याय कदापि सहन करणार नाही .उपोषण कर्त्याला तात्काळ न्याय मिळाला नाही तर शिवसेना पक्ष तीव्र स्वरूपात आंदोलन छेडेल व त्याची  परिणाम एस टी च्या मुजोर अधिकाऱ्यांना सोसावे लागतील .असे प्रतोष कोलथरकर यांनी सांगितले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा