उप जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते खाली म्हसळ्यात काळसुरी येथे झाले चावडी वाचन.



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील काळसुरी येथे उप जिल्हाधिकारी नितीन राऊत यांच्या अध्यक्षते चावडी वाचन झाले.सातबारामध्ये अचूक संगणकीकृत अधिकार अभिलेखांसाठी तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांकडून चावडी वाचन मोहीम हाती घेण्यात आली आहे. ई-प्रणाली व ई-चावडी प्रणालीची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी आम्ही सर्व महसुलची मंडळी काळसुरी महसुल गावांत आलो आल्याचे उप जिल्हा धिकारी नितीन राऊत यानी सांगीतले. यावेळी तहसिलदार शरद गोसावी, नायब तहसीलदार के टी भिंगारे,मंडळ अधिकारी डी.एच कर्चे, तलाठी वारळ गोरखनाथ माने , तलाठी मेंदडी जि.ए.गिर्हे,नरेश पवार ,सरपंच श्रीम अरुणा नाक्ती,उपसरपंच श्री संतोष नाक्ती,गाव अध्यक्ष श्री लक्ष्मण पाटील पोलीस पाटील श्री मनोहर वारगे ,तंटामुक्ती अध्यक्ष श्री राजेंद्र घोसाळकर व ग्रामस्थ , शेतकरी मोठया संखेने हजर होते.
तहसीलदार शरद गोसावी यानी ७/१२ , चावडी वाचनाचा ग्रामस्थ शेतकरी याना फायदा कसा होतो हे सांगितले यावेळी,चावडी वाचन कार्यक्रम अंतर्गत 7/12 वाचन करण्यात आले .तसेच खातेदारांना 7/12 वाटप , त्याचबरोबर 7/12 वरील इतर हक्कातील नोंदी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले . कार्यक्रमांतर्गत शिवार फेरी वेळी शेतकऱ्यांच्या 7/12 वरील पिकपाहणी च्या नोंद अद्यावत करण्यात आल्या. प्रांताधिकारी नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाने शासकीय जमिनी , स्मशान , गोवंड या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. शासकीय योजना जसे इंगायो, संगायो श्रावण बाळ या योजनांचे लाभार्थी यांची यादी वाचन करण्यात आले.व या योजना बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले . या सोबतच pm किसन सन्मान निधी योजना , pm किसन पेन्शन योजना याबाबत मार्गदर्शन केले. online 7/12 चा लाभ घेणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शासन स्तरावरून सुरु करण्यात आलेल्या पब्लिक डाटा एन्ट्री बाबत मार्गदर्शन करण्यात आले.


"चावडी वाचन मोहीमा अंतर्गत  संबंधीत महसूल यंत्रणेला सातबाराची सर्व्हे नंबर योग्य प्रकारे लिहिला आहे की नाही, यापासून अचूक संगणकीकृत सातबारा व आठ अ च्या अभिप्रायापर्यंत तब्बल 24 मुद्यांवर तपासणी करता येत असते व त्याच्याच आधारावर ७/१२ मध्ये सुधारणा किंवा अचूक नोंदी करता येतात"-शरद गोसावी,तहसीलदार म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा