सी.ए.परीक्षेत पाष्टीच्या अंकेश दिवेकर चे सुयश

फोटो-म्हसळा तालुक्यातील पाष्टी येथील अंकेश दिवेकर याने सी.ए.परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याचे त्याचे अभिनंदन करताना अंकेश चे आई-वडील


म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

द इंस्टिट्यूड ऑफ चार्टर्ड अकाउंन्ट्स ऑफ इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंन्ट्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवार दिनांक १६ जानेवारी २०२० रोजी रोजी जाहीर झाला. देशभरातून १५००३ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी दोन हजार २६८ विद्याथी उत्तीर्ण झाले. म्हसळा तालुक्यातील अतिशय ग्रामीण भागातील पाष्टी येथील कुमार अंकेश विठोबा दिवेकर याने २२० एवढे गुण मिळवून परीक्षेत यशस्वी होण्याचा मान मिळविला. शिक्षणासाठी मुंबई येथे वास्तव्याला असणाऱ्या कुमार अंकेश विठोबा दिवेकर याने सी.ए.होण्याची आकांशा बालवयातच मनाशी बाळगली होती. या यशानंतर बोलताना त्याने सांगितले की हे यश मी माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या प्रेरणेतून मिळविले असून मला यापुढेही या माध्यमातून जीवनात करियर घडवायची इच्छा असल्याचे सांगितले.म्हसळा तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ अशा पाष्टी या खेडेगावातील विद्यार्थ्याने एवढं उज्वल यश संपादन केल्याने संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून त्याचे कौतुक होत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा