शिक्षक समितीच्या वतीने सेवानिवृत्त कमळाकर चोरगे यांचा सत्कार समारंभ संपन्न.


तळा : किशोरपितळे
केंद्रीय शाळा तळाअंतर्गत तारणे  शाळेतील मुख्याध्यापक कमळाकर चोरगे सेवा नियत कालानुसार३१डिसेंबर१९रोजी सेवानिवृत्त झाले त्यांचा सपत्नीक ह्दयसत्कार समारंभ तळा प्राथमिक शाळा दगडी शाळा येथे शिक्षक समितीच्या वतीने १३फेब्रुवारी रोजी करण्यात आला शाल श्रीफळ भेट वस्तू व सुहासनी वाण पुष्पगुच्छ देण्यात आले यावेळी
व्यासपिठावर समिती अध्यक्ष विजय येलवे,कल्याणी वाजे कल्पना पवार प्रमोद मोरे,जगताप सर उपस्थित होते.यावेळी अनेक शिक्षक सहकारी यांनी कमळाकर चोरगे यांच्या सेवेतील आठवणी जाग्या केल्या. संघटना कशी वाढवायची  आणी संघटन कसे करावे त्यांच्याकामाची पध्दत,शिस्तप्रिय, कर्तव्य दक्ष आणी क्षमाशील अशी वर्तणूक होती.शिक्षक सेवेत असताना अनेक विद्यार्थीघडवून आदर्श विद्यार्थी कसा घडवला पाहिजे हे चोरगे गुरुजी कडून शिकावे.असे मनोगतात व्यक्त केले. या सत्काराला उत्तर देतांना चोरगे गुरुजी म्हणाले की मी अत्यंत कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊनडीएड पूर्ण केले.आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले पाहिजेज्ञान दानासारखे पवित्र कार्य करीत असतानाविद्यार्थी  शिक्षणात तडजोड न करता शिस्त लावली.सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातविद्यार्थ्यांना तयार केले. माझा समीती ने केलेला सन्मान आयुष्य स्मरणात राहील मी ऋणीआहे ज्या ज्या वेळेला गरज
लागेल तेव्हा आपल्याला सहकार्य मिळाले असे व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजयपवार गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील बैकर गुरुजी यांनी केले 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा