वेळासआगर गावात मकर संक्रांत पारंपरिक पद्धतीने साजरी

सर्फराज दर्जी -बोर्ली पंचतन
गुळाचा गोडवा ओठांवर येऊ दे, मनातील कडवटपणा बाहेर जाऊ दे. दु:ख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा; जीवन असावे तिळगुळासारखे... अशा गोड शुभेच्छा एकमेकांना देत बुधवारी मकरसंक्रांती हा नववर्षातील पहिला सण साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने घरोघरी पुरणपोळीचा बेत रंगला; तर दिवसभरात तिळगुळाची देवाणघेवाण करीत नात्यांमधला गोडवा अधिकच वाढला. मकर संक्रांतीला तीळगुळ खाण्याची/वाटण्याची पध्दत जूनी पद्धत आहे. 
मकरसंक्रांती म्हणजे दु:खद अनुभवांचा कडवटपणा दूर करून आयुष्यात गुळाचा गोडवा आणण्याचा संदेश देणारा सण.
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आहे. त्यापैकीच एक सण म्हणजे मकर संक्रांत.

 श्रीवर्धन तालुक्यातील वेळास गावात भंडारी समाजाच्या महिला मंडळाच्या वतीने गावातील होळीच्या पटांगणात कालभैरव मंदीरात गुरूवार दि. १६ जानेवारी २०२० रोजी दुपारी २वाजल्या पासून संध्याकाळ पर्यंत  हळदी कुंकू सजीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लाऊन ववसा दिला.
वेळास गावातील भंडारी समाजाच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.सेजल संदेश पेडणेकर व सचिव सौ. निहा निलेश पाटील त्याच प्रमाणे मंडळाच्या खजीनदार सौ.प्रिती सन्हेल कुमार नाईक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा