आंबेत येथे "आमचा गाव आमचा विकास" कार्यशाळा संपन्न

आंबेत प्रतिनिधी
ग्रुप ग्रामपंचायत आंबेत अंतर्गत घेण्यात आलेल्या गाव आराखडा सभेत तालुक्यातील प्रत्येक पंचायतीचा आमचा गाव आमचा विकास या कार्यशाळा पद्धतीचा अभ्यास करून शासनाने राबवलेली अतिशय अत्यावश्यक असलेली मसुदा आराखडा संकल्पना आंबेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जि परिषदेचे सदस्य बबन मनवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . यावेळी ग्रामपंचायत अंतर्गत कोणकोणत्या बाबी नागरिकांपर्यंत पोहचवता येतील याचा पुरेपूर अभ्यास करून पंचायत समिती म्हसळा यांच्या वतीने आंबेत खाडीपट्टा विभागातील ग्रामपंचायतीना एकत्र घेऊन वंचित घटकांची सभा , बचत गटांची सभा , शून्य ते अठरा वर्षातील मुलांची सभा घेऊन योग्य त्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली . ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सुरू झालेल्या पंधरावा वित्त आयोगाच्या माध्यमातून गावपातळीवर कोणत्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी प्रोजेक्ट राबविता येतील याचादेखील संवाद गटविकास अधिकारी यांनी उपस्थित नागरिकांशी साधला. आपल्या प्राथमिक गरजा जर का नागरिकांना मिळाल्या तर मुंबईसारख्या शहरात जाण्याची वेळ या विभागातील जनतेवर येणार नाही. डोंगरी विभागात मोडणाऱ्या या ग्रामपंचायतीचा मसुदा लवकरच तयार करून डोंगरी विभागाचा निधीसुद्धा या कार्यासाठी तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता असे सभापती छाया म्हात्रे यांनी स्पष्ट करून देत उपस्थितांशी सवांद साधला

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा