श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
महाराष्ट्राच्या इतिहासातील अग्रणी सेनांनी बाळाजी विश्वनाथ भट यांनी पेशवे पदाची सुत्र स्वीकारलेल्या घटनेस 17 नोव्हेंबर 2019 ला 306 वर्ष पूर्ण झाली आहेत .त्याचे औचित्य साधून श्रीवर्धन मधील श्रीमंत पेशवे आळी मंडळाच्या वतीने पेशवे स्मारकाच्या परिसरात सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्यात आला .स्मारकाच्या प्रवेशद्वारा जवळ रांगोळी काढण्यात आली व त्या नंतर सायंकाळी तरुण मंडळींनी पेशवे स्मारकाच्या प्रांगणात सर्व ठिकाणी पणत्या प्रज्वलित करून रोषणाई निर्माण केली .बाळाजी विश्वनाथ भट हे छत्रपती शाहू महाराज यांचे विश्वासू सहकारी होते .शाहू यांनी स्वामिनिष्ठ सेवक असा बाळाजी विश्वनाथ यांचा गौरव केलेला विविध प्राप्त पत्रा तून निदर्शनांस येते .2 एप्रिल 1720 रोजी श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट यांचे देहावसान झाले होते .यंदा पेशव्यांचे 300 वे पुण्यतिथी वर्ष सुरू आहे .
छत्रपती शाहू यांचे पंतप्रधान या नात्याने बाळाजी विश्वनाथ भट्ट यांच्या पराक्रमाची नोंद इतिहासाने घेतली आहे .अंदाजे 1400व्या शतकापासून श्रीवर्धन च्या भट्ट घराण्याकडे श्रीवर्धन ची देशमुखी वंशपरंपरागत पद्धतीने चालत आली होती .सिद्धी संस्थाना कडून सदरची देशमुखी चालत आल्याचे इतिहासात नोंद आहे .त्या काळातील जुन्या वास्तू पैकी 60×40 चा जोत्याचा दगडी चौथरा (जोता) होता .त्यावर 1960 साली सत्कार्य सेवा समाज या संस्थेने आजमितीची दगड कौलारू इमारत बांधली होती .सदर इमारतीची मालकी सद्यस्थितीत श्रीवर्धन नगरपालिके कडे आहे .श्रीवर्धन नगरपरिषदेला 1988ला शँभर वर्ष पूर्ण झाल्याकारणे तत्कालीन नगरपालिका कार्यकारणीने श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा पूर्णाकृती पुतळा व सभोवार शनिवार वाड्याची लहान प्रतिकृती सभोवार उभारली .या कामी तत्कालीन विधान परिषद अध्यक्ष जयवंतराव टिळक ,कॅप्टन वासुदेव बेलवलकर व शिल्पकार गोसावी व नगरपालिकेतील अभियंता विनायक दाते यांचे अमूल्य योगदान होते . पेशवे स्मारक परिवार सदैव पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू मानला जातो .स्मारक परिसरात केलेले दीप प्रज्वलन सर्व स्थानिक जनता व पर्यटक यांना आकर्षित करत होते .
Post a Comment