म्हसळ्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा


बाळासाहेबांचे स्वप्न साकार होण्यासाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा - तालुका प्रमुख महादेव पाटील

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा तालुक्यातील शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. तालुका प्रमुख महादेव पाटील व बालशेठ करडे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच दिवसभर पक्ष कार्यालयात प्रतिमा दर्शन ठेवण्यात आले होते.
तालुका प्रमुख महादेव पाटील यांनी सांगितले की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असून अखंड हिंदुस्थान चे दैवत असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती आजच्या तरुण पिढीने आत्मसात करून घेणे गरजेचे आहे असे सांगून आम्ही बाळासाहेबांच्या आशीर्वादाने घडलेले शिवसैनिक आहोत असे सांगताना बाळासाहेबांचे स्वप्न साकार होणेसाठी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी बाळासाहेबांना दिलेल्या वाचनाची पूर्तता होणेसाठी आता सुरू असलेल्या सत्ता संघर्षात शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा अशी प्रार्थना केली आणि तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने आदरांजली वाहिली असल्याचे महादेव पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटक कृष्णा म्हात्रे यांनी केले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील, माजी विरोधी पक्षनेते बालशेठ करडे, शहरप्रमुख अनिकेत पानसरे, पक्ष संघटक कृष्णा म्हात्रे, उप शहरप्रमुख विशाल साळुंखे, विशाल सायकर, सरपंच अनंत नाक्ती, अमित म्हामूनकर, देवघरचे माजी सरपंच म्हामूनकर, सुतार, राजेश करडे, संतोष सुर्वे, प्रकाश करडे, मनोहर पाटील, तेजस माळी, अजय करंबे, कल्पेश जैन, रुपेश साळुंखे, कौस्तुभ करडे, अभय कळमकर, सुजित बोरकर यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा