कामे खोळंबल्यामुळे आ .अनिकेत तटकरे नाराज ; म्हसळ्यातील विकासकामांचा घेतला आढावा.

कामे खोळंबल्यामुळे आ .अनिकेत तटकरे नाराज म्हसळ्यातील विकासकामांचा घेतला आढावा ; अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत असमाधान 

म्हसळा प्रतिनिधी
तालुक्यातील नागरिकांना वेगवेगळ्या निवडणूक काळात त्यांचे गाववाडीत सार्वजनिक विकासकामांबाबत दिलेल्या वचनाची पूर्तता करून देण्यासाठी आमदार अनिकेत तटकरे यांनी म्हसळा तालुका पंचायत समिती सभागृहास आणि नगर पंचायत म्हसळा कार्यालयात आढावा बैठक घेतली . या बैठकीत प्रामुख्याने पाणी पुरवठा , कृषी विभाग , जिल्हा परिषद बांधकाम , पशुसंवर्धन आदी खात्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला . मात्र निधी असूनही कामे खोळंबल्यामुळे आ . अनिकेत तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली . म्हसळा तालुक्याच्या विकासासाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजनेतून खासदार सुनील तटकरे , रायगड जिल्हा परिषद , आमदार निधीतून माज्या व विद्यमान आमदार आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे , परतु विकास निधी मजुरी कामास वेळेत खर्च होत नसल्याने अनेक ठिकाणी कामे खोळंबली असल्याचे निदर्शनास आले आहे . पंचायत समितीच्या आढावा सभेला ज्येष्ठ नेते अलि कौचाली , सभापती छाया म्हात्रे , उपसभापती संदीप चाचले , जिल्हा परिषदेचे सदस्य बबन मनवे , माजी सदस्या वैशाली सावंत , माजी सभापती नाझीम हसवारे , पंचायत समिती सदस्य मधुकर गायकर , माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे , उपनगराध्यक्ष संजय कर्णिक , सरपंच अंकुश खडस , व्यंकटेश सावंत . सहाय्यक गटविकास अधिकारी पाणी परवठा अभियंता गांगर्डे , बांधकाम अभियंता काकूलसे , मेंदाड , कृषी अधिकारी अनाप , मख्याधिकारी मनोज उकिर्डे आदी उपस्थित होते . आढावा सभेत आमदार अनिकेत तटकरे यांनी जिल्हा परिषद पाणी पुरवठा अभियंता गांगुर्डे यांच्यामार्फत पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला असता म्हसळा तालुक्यात राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सन २०१९ - २० १४ गावांसाठी साधारणपणे ५७७ . ७६ लक्ष रुपये निधीची मंजुरी मिळाली आहे , मंजुरी पाणी पुरवठा योजनांचे कागदपत्रे पूर्तता कामात दिरंगाई असल्याने निम्या अधिक गावात कामांना हातच लावण्यात आला नाही . यामध्ये गोंडघर , काळसुरी , कोंझरी , पानवे पाणी पुरवठा योजनेचा समावेश आहे . तुरुंबाडी , सरई मोहल्ला , खारगाव बद्रक , मांदाटने , केळटे - बाउलकोंड , सोनघर , साळवींडे , वावे या नळपाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर तर मेंदडी येथे नवीन पाणी योजनेकरिता २० लाख रुपये मंजूर असल्याचे सांगितले . सन २०१८ - १९ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेमधून अंदाजे ५ कोटी रुपये खर्च निधीच्या योजना मंजूर आहेत पाणी पुरवठा कार्यालयामार्फत मंजुरी योजना जास्त पण काम करण्यास अधिकारी वर्ग नसल्याने कामांची वेळीच पूर्तता होत नसल्याची बाब अभियंता गांगुर्डे यांनी आमदार अनिकेत तटकरे यांचे निदर्शनास आणून दिली आहे . 
म्हसळा तालुक्यात अद्याप २६ योजना अपूर्ण आहेत हँडवर्क करण्याच्या जुन्या योजनाचे काम पूर्ण न झाल्याने त्या त्या गावांमध्ये नवीन योजना राबविण्यात शासन स्तरावर अडचणी येत आहेत . माहे जानेवारी नंतर तालुक्यात म्हसळा , मेंदडी आणि तोंडसुरे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईग्रस्त स्थिती निर्माण होणार आहे . याबाबत शासन स्तरावर वेळीच उपाययोजना करावी , अशी मागणी केली आहे . पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी सभेला उपस्थित राहिल्याने त्यांनी पाठवलेल्या प्रतिनिधीला आमदारांनी विचारलेल्या एकही प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत म्हसळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि आमदार , खासदार फंडातून सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा