संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
माहे ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१९ "क्यार" व "महा" चक्री वादळ व अवेळी पावसामुळे तालुक्यातील नव्हे तर रायगड जिल्ह्याती ल शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. बाधीत शेतकऱ्याना मदत देण्या संर्दभात दि. १६.११.२०१९ रोजी राज्यपाल महोदयांचे अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीनुसार शेती पिकाला रु८००० प्रति हे . व फळबागाना रु१८,००० प्र. हेक्टर आर्थिक सहाय्य मिळणार आहे. म्हसळा तालुक्यात भातपिकाखाली एकूण क्षेत्र २६८९.हेक्टर आहे. त्यापैकी १७५५ शेतकऱ्यांचे ५३०.०२ हे.क्षेत्र बाधीत असून त्याना रु ४२ लक्ष ४० हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
"मदत २ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मिळणार आहे,अपदग्रस्त शेतकऱ्याना महसुलात सूट, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाल्याना शाळा महाविद्यालयीन परिक्षा शुल्कात माफी मिळणार आहे. नुकसानीची रक्कम अपदग्रस्त शेतकऱ्याचे बँक खात्यावर थेट जमा होणार आहे, मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये असे शासनाचे आदेश आहेत."
शरद गोसावी, तहसीलदार म्हसळा.
Post a Comment