लोकवर्गणीतून मांदाटने प्राथमिक शाळा झाली ई-लर्निंग शाळा


म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर

ग्रामीण भागातील मुलांकडे शालेय वयात असलेले  टॅलेंट पुढे आणुन भविष्यात त्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत भाग घेता यावे. संगणकीय युगात प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळावे हे स्तुत्य हेतु ठेवून रायगड जिल्हा परिषदेच्या मांदाटने येथील प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलामुलींच्या पालकांनी लोकवर्गणी जमा करून तीस हजार रुपये किंमतीचा ई.लर्निंग संच खरेदी केला. या संचात इ.1ली ते 7 वी पर्यंतच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम डाऊनलोड केलेले आहे. त्याद्वारे अभ्यासातील नवीन संकल्पना, संबोध विद्यार्थ्यांना समजावून घेण्यास सोपे होणार आहे. मुलांना पाठ्यांशाचे आकलन सुलभतेने होणार असल्याने मांदाटने गावातील प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांच्या पालकांची आपल्या पाल्याप्रती असलेली दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे. ई-लर्निंग शिक्षणाचा महत्त्व शाळेतील आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक नरेश सावंत यांनी पालक सभेत पालकांना व्यवस्थितपणे समजवून सांगितले असता पालकवर्गाकडुन त्याचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अशाने मांदाटने शाळेतील विद्यार्थी वर्गाचे संगणकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. शाळेत ई-लर्निंग शिक्षण घेणे कामी शिक्षकांनी दर दिवशी इयत्तावार नियोजन केलेले आहे. बहुवर्ग अध्यापन पध्दतीमध्ये ई-लर्निंग हे फारच प्रभावी माध्यम आहे.
  मुख्याध्यापक नरेश सावंत, विषय शिक्षक महादेव पवार, उपशिक्षक पथवे, गायकवाड सर यांनी पालकांनासमोर ठेवलेले उद्दिष्ट् सत्यात उतरविल्याने विध्यार्थी आणि शिक्षक यांनी आंनद व्यक्त करून पालकांना धन्यवाद दिले आहेत. आदर्श गाव निर्माण करण्यासाठी शिक्षण हे कालाची गरज ओळखुन मांदाटने गावातील विध्यार्थी पालक वर्गाने शाळेसाठी मोठे आर्थिक सहाय्य करून सर्वांसमोर स्तुत्य उपक्रम राबवुन आदर्श ठेवले असल्याने मांदाटने ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा