घरकुल योजनेअंतर्गत तालुक्याचा चौथा क्रमांक : राज्यपालांनी केले कौतुक


फोटो- केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत राज्यात म्हसळा तालुक्याचा चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक राज्यपाल भगतसिंह कौश्यारी यांच्या कडून स्वीकारताना गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, सोबत मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हलडे व मान्यवर

सर्वांच्या सहकार्याने चांगली कामगिरी करू शकलो - गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

   रमाई आवास योजना व घरकुल संदर्भातील इतर योजनांची अंमलबजावणी करण्यात म्हसळा तालुक्याने राज्यात चौथा क्रमांक पटकाविला असून राज्यपाल भगतसिंह कौश्यारी यांच्या हस्ते म्हसळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी हा पुरस्कार स्वीकारून संपूर्ण राज्यात म्हसळा तालुक्याचे नाव उंचावण्यास महत्वाची कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामिण घरकुल योजना, केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजने अंतर्गत प्रथम टप्प्यात 90.8  टक्के घरकुल पूर्ण करून राज्यामध्ये रायगड जिल्ह्यातून म्हसळा तालुक्याने राज्यात चौथा क्रमांक मिळवून योजनेच्या प्रगतीत दिलेल्या योगदाना बद्दल राज्यपाल भगतसिंह कौश्यारी यांच्या कडुन तालुक्याचे गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी रायगड जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलिप हलडे आणि मान्यवर उपस्थित होते.


राज्यात म्हसळा तालुक्याला घरकुल योजनेत चौथा क्रमांक मिळाला ही बाब आमच्यासाठी आनंदाची आहे. ही कामगिरी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, उपमुख्यकार्यकारी  अधिकारी, प्रकल्प अधिकारी तसेच पंचायत समिती सभापती, उपसभापती, पं.स.सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण स्तरावर सरपंच, ग्रा.प.सदस्य व ग्रामसेवक आणि संबंधित लाभार्थी त्याचबरोबर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या आवश्यक त्या सहकार्यामुळेच तालुका घरकुल योजनेत उत्तम प्रकारे काम करून कौतुकास पात्र ठरला आहे. 
-श्री.वाय.एम.प्रभे, गटविकास अधिकारी पंचायत समिती म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा